शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

Coronavirus: दंत महाविद्यालय होणार कोविड रुग्णालय; ५०० खाटांची होणार सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 1:23 AM

अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केली तयारी

अंबरनाथ : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता अंबरनाथमध्येही रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. भविष्याचा विचार करुन अंबरनाथ पालिकेने ५०० खाटांचे रुग्णालय दंत महाविद्यालयात सुरू करण्याची तयारी केली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशामुळे प्रत्येक शहरात रुग्णालयाची सोय उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार पालिकेने दंत महाविद्यालय ताब्यात घेऊन त्या ठिकाणी अधिकाधिक रुग्णांना सामावून घेता येईल याचा विचार सुरु केला आहे. तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीची मागणीही जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. अंबरनाथ नगरपालिकेने शहरात रुग्णांची संख्या वाढल्यावर उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येक शहरात कारोनाबाधितांवर उपचार करणारी यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अंबरनाथ नगरपालिकेने ५०० ते ८०० रुग्णांवर उपचार करता येईल अशी यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

शहरातील शाळा, महाविद्यालय, सभागृह आणि इमारती यांची चाचपणीही प्रशासनाने केली आहे. त्यानंतर अंबरनाथ पालिकेने बंद अवस्थेत असलेले दंत महाविद्याल कोवीड रुग्णालयासाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे. जे कोरोनाबाधित आहेत मात्र त्यांच्यात लक्षणे दिसत नाहीत अशा ३००, त्यांच्यात कारोनाचे लक्षण आहेत मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे अशा ३०० रुग्णांसाठी आणि ज्यांची प्रकृती कोरोनामुळे खराब झाली आहे त्यांना आॅक्सिजनची गरज आणि काहींना व्हेंटिलेटरची गरज आहे अशा २०० रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे प्रयत्न पालिकेने सुरु केले आहेत. त्यात अंबरनाथचे सिटी रुग्णालयही ताब्यात घेतले आहे. मात्र ही यंत्रणा राबविण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ आणि यंत्र सामग्रीचा प्रस्ताव अंबरनाथ पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. तत्पूर्वी दंत महाविद्यालयातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.अद्याप यंत्रसामग्री नाही : अंबरनाथ पालिकेने रुग्णालय सुरू करण्याची तयारी केली असली तरी अद्याप त्यांना कोणतीही यंत्रसामग्री मिळालेली नाही. त्यामुळे अंबरनाथ पालिकेला जिल्हा प्रशासनाच्या निर्णयावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यंत्रसामग्री आणि डॉक्टर उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अंबरनाथमध्ये रुग्णालय सुरु करण्यात अडचणी येणार आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस