शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Coronavirus : ठाणे पालिका मुख्यालयात नागरिकांना मर्यादित प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 1:18 AM

नागरिकांनी त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या वेबसाइटवरील संबंधित विभागाशी ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ठाणे : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समितीमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना पुढील आदेशापर्यंत अत्यावश्यक कामकाज वगळता प्रवेश मर्यादित करण्यात आले आहेत. दरम्यान, नागरिकांनी त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या वेबसाइटवरील संबंधित विभागाशी ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने काढलेल्या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या वतीने मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.महापालिका भवनात होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने नागरिकांना मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या वेबसाइटवरील संबंधित विभागाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. प्राप्त ईमेलवरील रीतसर कार्यवाही करून सात दिवसांत नागरिकांना ईमेलद्वारे माहिती देण्यात येणार आहे. अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ईमेलद्वारे पाठविण्यात यावेत, तसेच ठाणे महानगरपालिका कार्यालयात दैनंदिन टपाल व इतर महत्त्वाच्या कामासाठी येणाºया कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक विभागाच्या वतीने प्रवेशद्वारावरच टपाल स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.महानगरपालिकेचा कर व अन्य देय रकमांसाठी नागरिकांना डिजिटल आॅनलाइन सेवेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आॅफलाइन कर व तत्सम भरणा करण्यासाठी मर्यादित स्वरूपात महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये प्रवेश देण्याची दक्षता सुरक्षा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.सर्व विभागप्रमुख/अधिकारी यांच्याकडे होणाºया बैठका तातडीच्या असल्या, तरच आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकांसाठी बाहेरील अधिकारी अथवा खासगी व्यक्तींना आमंत्रित करण्यात येणार नाही. कर्मचाºयांच्या दैनंदिन हजेरीसाठी वापरण्यात येणारी बायोमेट्रिक मशीनची हजेरी प्रक्रि या बंद करण्यात येत असून, प्रत्येक विभागामध्ये हजेरीपट ठेवून त्याद्वारे हजेरीची नोंद ठेवण्यात येणार आहे.ठाणे न्यायालयाचे कामकाज पहिल्याच सत्रात राहणारठाणे: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारपासून ३१ मार्चपर्यंत ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज पहिल्याच सत्रात सुरू राहणार असून, त्यानंतर (जेवणानंतर) काम पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहे. कोरोनामुळे न्यायालयात येणाºयांची संख्याही कमी झाली आहे. वकील संघटनेने तीन बार रूममध्ये सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवल्या असून, वकील सदस्यांना मास्कचेही वाटप केले आहे. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात जवळपास ६० न्यायालय आहेत. ठाणे जिल्हा वकील संघटनेचे एकूण चार हजार सदस्य आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात दिवसाला साधारणत: दोन हजार नागरिकांची ये-जा सुरू असते. यामध्ये पोलिसांसह कैदी आणि साक्षीदार तसेच पक्षकारांचा समावेश आहे. ही गर्दी कमी होऊन दिवसाला ५००च्या आसपास आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारपासून संघटनेचे तिन्ही बार रूम, लायब्ररी, आयटी लायब्ररी, कॅन्टीन सकाळी १०.३० वाजता उघडून दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात येतील. न्यायालयाची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ राहणार असल्याची माहिती संघटनेने दिली.संघटनेमार्फत मास्कचे वाटप : ठाणे जिल्हा वकील संघटनेने मंगळवारी बार रूममध्ये मास्कचे वाटप केले. या वेळी जवळपास २०० मास्कचे वाटप करण्यात आले असून, मास्क लावून सदस्य काम करताना दिसले.सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतला आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज सुरू राहणार आहे. २.३० नंतर न्यायालयातील बार रूम आणि कॅन्टीन बंद होणार आहे. ३१ मार्चपर्यंत कामाची वेळ हीच राहणार आहे. पक्षकारांसह साक्षीदारांची संख्या कमी झाल्यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी झाले आहे.- प्रकाश कदम, अध्यक्ष,ठाणे जिल्हा वकील संघटनापोषण पंधरवडा कोरोनामुळे रद्दठाणे : जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटाच्या बालकांमधील कुपोषण कमी करण्यासह किशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्ताल्पता (अनेमिया) आणि वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने पोषण पंधरवडा सुरू केला होता. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी तो बंद केला आहे. या भीतीमुळे ग्रामीणच्या अंगणवाडी केंद्रदेखील बंद करण्याची मागणी सेविकांकडून होऊ लागली आहे. जिल्ह्यातील सर्व गावपाड्यांमध्ये महिला व बाल विकास विभागाकडून हा पंधरवडा २२ मार्चपर्यंत राबवण्यात येणार होता.कोरोनामुळे पोषण पंधरवाडा बंद करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाने सोमवारी जारी केले आहेत, यामुळे जिल्ह्यात सुरू असलेला हा पंधरवडा पुढील आदेश येईपर्यंत बंद केला आहे. कोरोनाची भीती लक्षात घेऊन पालक त्यांच्या बालकांना अंगणवाडीत पाठवत नाहीत, यामुळे ग्रामीणमधील अंगणवाडी केंद्रही काही दिवस बंदची मागणी सेविकांकडून होऊ लागली आहे. महापालिका, नगरपालिकांच्या शहरी भागातील अंगणवाडी केंद्र बंद केले आहेत. त्याप्रमाणेच ग्रामीण व दुर्गमभागातील अंगणवाड्याही बंद करण्याच्या आदेशाची अपेक्षा आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरबदारीची बाब म्हणून ठाणे महानगरपालिकेने येत्या २० मार्च रोजी होणारी महासभा रद्द केली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत महासभा घेतली जाणार नसल्याचेही पालिकेच्या सचिव विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका