ठाणे: अत्यावश्यक सेवा तसेच किराणा, भाजीपाला आणि वैद्यकीय सेवा वगळता ठाणे महानगरपालिका क्षेत्रत पुन्हा 12 ते 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रंनी दिली.
ठाणे शहरात तसेच जिल्ह्यातील बहुतांश भागात यापूर्वीच 2 जुलै रोजी सकाळी 7 ते 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. शहरात सध्या 392 कंटेनमेंट झोन असून रुग्णांची संख्याही गुणाकार पद्धतीने वाढली आहे. बुधवारी 296 रुग्ण शहरात आढळले होते. तर गुरुवारी यामध्ये तब्बल 348 ने वाढ झाली. गुरुवारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 12 हजारांच्या घरात गेली असून मृतांची संख्याही 465च्या घरात गेली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रतील 12 जुलैपर्यंतचा लॉकडाऊन कालावधी 19 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे महापालिकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
यात केवळ घरकाम करणाऱ्या व्यक्तींना तसेच अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना कामावर जाण्याची मुभा राहणार असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
‘‘कोरोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी 15 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक होता. सुरुवातीला तो दहा दिवसांचा केला होता. यात आता आठ दिवसांची वाढ केली आहे. यातून घरकाम करणाऱ्या कामगारांना मात्र वगळण्यात आले आहे. यामध्ये किराणा आणि भाजीपाला हे संबंधित कंटेनमेंट झोननुसार काही काळासाठी सुरू राहणार आहेत,’’ असे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी म्हटले आहे.
बरे झालेले रुग्ण अधिक -ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, भिवंडी, अंबरनाथ या शहरांत अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, जि.प. सदस्य, अनेक नगरसेवकांसह पत्रकार, विविध कर्मचारी, पोलिसांसह बेस्ट, टीएमटी, केडीएमटी, एसटी कर्मचाऱ्यांनाही ड्युटी करताना कोरोनाची लागण झाली आहे. यात बहुसंख्य लोकांनी कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा
कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी
ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर