शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

Coronavirus : कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नात झाली मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 2:11 AM

ठाणे स्थानकातून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या दोन दिवसांत ८० ते ९० हजारांवरून ६१ हजारांवर आली आहे.

 ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. या स्थानकातून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या दोन दिवसांत ८० ते ९० हजारांवरून ६१ हजारांवर आली आहे. ही संख्या घटल्याने रेल्वेच्या उत्पन्नावर पाच ते दहा लाखांचा परिणाम झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.ठाणे रेल्वेस्थानकात एकूण १० फलाट आहेत. त्यातील फलाट क्रमांक १ ते ६ वरून मध्य रेल्वेवरील तर ९ ते १० वरून ट्रान्स-हार्बर (वाशी-पनवेल), तर ७ ते ८ या फलाटांवरून एक्स्प्रेस आणि मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या अंदाजे ७८२ अपडाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेल सुमारे २८२ अप-डाउन लोकल, तसेच जवळपास ८० अप आणि ७० डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. ठाणे रेल्वेस्थानकातून सरासरी ८० ते ९० हजार लोकल प्रवासी तिकीट घेतात. तिकीटविक्रीतून रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत ४० ते ५० लाखांचे उत्पन्न येते. मात्र, कोरोनामुळे सोमवारी सरासरी ६३ हजार तिकीटविक्री झाली. मंगळवारी ही संख्या दोन हजारांनी कमी होऊन ६१ हजारांवर येऊन थांबली आहे. या विक्रीतून ३० ते ३५ लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले. दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात. ती संख्या ३५ ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.वातानुकूलित लोकलवर परिणामवातानुकूलित लोकलचे तिकीटदर जास्त असल्याने याची प्रवासीसंख्या कोरोनामुळे कमी झाली आहे. सरासरी १८ तिकीट घेऊन प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या चारने घटली आहे. मात्र, पासने प्रवास करणाऱ्यांची संख्या स्थिर आहे. ती संख्या पाच इतकी आहे.ठाण्यात थर्मल यंत्राद्वारे तपासणी सुरूठाणे रेल्वेस्थानकात मध्य रेल्वेच्या वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून कोरोना तपासणी कक्ष सुरू केला आहे. या कक्षात थर्मल यंत्राद्वारे प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासले जाते. आजपर्यंत ठाणे स्थानकातील या कक्षात एकही प्रवासी संशयित आढळलेला नाही, असा दावा रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात आला आहे. मंगळवारी सुरू केलेल्या या कक्षात बुधवारी दुपारपर्यंत ४०० हून अधिक नागरिकांनी फलाट क्रमांक २ येथे तपासणी केली असून, लवकरच आणखी एक थर्मल यंत्र येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

टॅग्स :thaneठाणेIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस