- नितिन पंडीतभिवंडी- जगभर कोरोनाने थैमान घातले असून देशासह राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा व गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भिवंडीतील धर्मराजा गृपचे अध्यक्ष नगरसेवक निलेश चौधरी व नितेश ऐनकर यांच्या माध्यमातून ताडाळी येथे कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले आहे. या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज 15 हजार गरिबांना रोज दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातील विविध सेवाभावी संस्थेच्या वतीने या कायुनिटी किचनसाठी मदत देखील करण्यात येत आहे. गुरुवारी गुंदवली गावातील सुमित म्हात्रे यांनी लहानपनापासून साठवलेली पुंजी कम्युनिटी किचनसाठी दान केली. याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे देखील उपस्थित होते. लहानपणापासून मी पैशांची बचत केली होती. मागील काही काळ त्याकडे दुर्लक्षदेखील झाले होते. मात्र ही माझ्या लहानपनाची खास आठवण आणि साठवण होती. आज या निधीची खरी गरज आहे असे मला वाटल्याने मी ही रक्कम आज या कम्युनिटी किचनासाठी दिली, विशेष म्हणजे आज घरच्यांना हे सांगितल्यानंतर माझ्या घरच्यांनीदेखील यात काही रक्कम टाकली असून ही सर्व जमा पुंजी आज कम्युनिटी किचनला देताना वेगळेच समाधान मिळत आहे." अशी प्रतिक्रिया याप्रसंगी सुमित म्हात्रे यांनी दिली.
CoronaVirus: गरिबांच्या जेवणासाठी लहानपणापासूनची आठवण अन् साठवण दान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 4:06 PM