कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाची लागण झालेले 20 रुग्ण आढळून आले आहे. आत्तार्पयत आढळून आलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येत हा सगळयात मोठा आकडा आहे. नव्या रुग्णांमध्ये 2 महिन्या बालिका व 32 वर्षीय online डिलिवरी बाॅयचा समावेश आहे. ही बालिका डोंबिवली पश्चिमेतील असून कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका हद्दीत एकूण रुग्णांची संख्या 253 झाली आहे.
नव्या रुग्णांमध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी बाॅय हा कल्याण पूर्वेत राहताे. कोरोनाची लागण झाली आहे. तो कल्याण पूव्रेत राहतो. कल्याण पूव्रेतील दोन व कल्याण पश्चिमेतील एक अशा तीन पोलिसांना कोरानाची लागण झाली आहे. कल्याण पूव्रेतील दोन व कल्याण पश्चिमेतील एक अशा तीन आरोग्य खात्यातील कर्मचारी आहेत. कल्याण पश्चिेत राहणारा खाजगी कंपनीतील कर्मचारी, आंबिवलीत राहणारा तरुण हा खाजगी कंपनीत कामगार, डोंबिवली पूव्रेतील खाजगी रुग्णालयातील कर्मचारी यांना कोरोना झाला आहे. हे नऊ जण मुंबईत कामाला आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील सहा जणांना व कल्याण पश्चिमेतील 3 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे नऊ जण कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाली आहे. कल्या पश्चिमेतील 62 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. मात्र तिला कशामुळे लागण झाली हे कळू शकलेले नाही. त्यामुळे ही नवी रुग्ण म्हणून गणली गेली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 76 जणांना ते कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरीत 174 रुग्ण हे कोरोनाचा उपचार घेत आहेत.
लागण झालेल्या नव्या 20 रुग्णांपैकी 9 जण हे मुंबईत कामाला जाणारे आहेत. महापालिका हद्दीत राहणारे मुंबईत कामाला जाणा:यांना रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईत कामाला जाणा:यांनी कामावरुन घरी आल्यावर होम आयसोलेशन राहावे. लहान मुले व घरातील वृद्धांपासून सोशल डिस्टसिंग पाळावे. महापालिकेच्या निदर्शनास आले आहे की, दोन जवळ असलेल्या घरातून वस्तूंचे देवाण-घेवाण केली जात असल्याने कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे देवाण-घेवाण केल्यास सॅनिटायङोशन केले पाहिजे. हात धुतले पाहिजेत असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महत्वाच्या बातम्या...
रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात