CoronaVirus लॉकडाऊन संपेना! वैतागून हजारो कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे परराज्यात रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 07:48 PM2020-05-10T19:48:48+5:302020-05-10T19:55:47+5:30
शासनाच्या वाहन व्यवस्थेची अपेक्षा करण्याऐवजी एमपी, बिहार, युपीतील बहुतांशी मजूर एकत्र येऊन ट्रकच्या माध्यमातून गाव गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या संचार बंदीत अडकलेले नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आदी परिसरातील हजारो कामगार, मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे मुंबई - नाशिक या राष्ट्रीय महामार्गाने गावी निघाले आहेत. ट्रक, टेम्पो, सायकल तर काही पायीच निघाले आहेत. एकदमच निघालेल्या या हजारो मजुरांमुळे या महामार्गावरील कसारा व इगतपूरी घाटात वाहतूक कोंडी झाल्याचे येथील प्रत्यक्षदर्शी लक्ष्मण कांबळे यांनी सांगितले.
शासनाच्या वाहन व्यवस्थेची अपेक्षा करण्याऐवजी एमपी, बिहार, युपीतील बहुतांशी मजूर एकत्र येऊन ट्रकच्या माध्यमातून गाव गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. उल्हासनगर येऊन मागील तीन दिवसांपासून या ट्रक संध्याकाळी, रात्री नाशिक मार्गे गावी जात आहेत. मागील काही दिवसांपासून सायकलीने तब्बल 15 हजारांपेक्षा अधिक मजूर गावी गेल्याचा अंदाज कांबळे यांनी दिला. तर पायी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कसारा घाटातील चेक पोस्टवर या मजुरांना पाच हजार मँगो ज्यूसच्या बाटल्या आज वाटप केल्याचे सेवा निवृत्त प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे यांनी सांगितले. या पायी जाणाऱ्या मजुरांना दोन दिवसात नाशिक येथून 79 बसेसने पुढे सोडण्यात आले. शनिवारी 42 व आज 37 बसेस नाशिक येथून सोडल्याचे मुंडावरे यांनी एसटी महा मंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैंड यांचा हवाला देत सांगितले.
कोरोना संचार बंदीत अडकलेले मुंबई, ठाणे परिसरातील कामगार, मजूर गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांचे व पोलिसांचे प्रमाणपत्र प्राप्त करु पायी, ट्रक, सायकल, टेम्पोच्या माध्यमातून आपले गाव गाठण्यासाठी निघालेले आहेत. मे महिना अर्धा संपण्यावर आला, त्यात आवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज ही व्यक्त होत आहे. मात्र, त्यास न जुमानता आणि शासनाच्या वाहन व्यवस्थेची अपेक्षा न करता पाऊस पडण्याआधी मुलाबाळांसह या मजुरांनी गांव गाठण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना सहकार्याची जोड देत या महामार्गांवरील गावकरी, सामाजिक संस्थांमार्फत जेवण, पाणी, पुरवण्यात येत आहे. कायद्याचे पालन करीत चेक पोस्ट नाक्यावरील पोलीस यंत्रणा मात्र या ट्रक, टेम्पोमधील कामगारांना खाली उतरण्यास भाग पाडत आहे. पण चेक नाक्याच्या पुढे गेल्यानंतर संबंधीत मजूर त्यांच्या ट्रकचा ताबा घेऊन पुढचा प्रवास करीत असल्याचे वास्तव येथील प्रत्यक्षदर्शीं कडून ऐकायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या...
काँग्रेसचं ठरलं! उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून देणार
लय भारी! विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबर
एकच धून 6 जून! रायगडावर शिवराज्याभिषेक होणारच; छत्रपती संभाजीराजेंची घोषणा
Vidhan Parishad Election: ...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवावी, भाजपाचा युतीधर्मावरून टोला
Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी