मीरारोड - मीरा भाईंदरमधील शिवसेनेच्या तसेच ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. दहीहंडीसाठी होणाऱ्या खर्चाच्या 1 कोटीच्या रकमेतून औषधे, सॅनिटायझर व मास्कचे नागरिकांना मोफत वाटणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या 2 रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा 27 जून रोजी वाढदिवस असून त्या निमित्ताने मीरा भाईंदर व ठाण्यासाठी व्हेंटिलेटर असलेली सुसज्ज रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत देण्यात येणार आहेत. सध्या शिवसेनेच्या वतीने शाखा तेथे दवाखाना सुरू करण्यात आला असून तेथे डॉक्टारांमार्फत मोफत तपासणी व मोफत औषधे दिली जात आहेत असं सरनाईक यांनी सांगितलं आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दहीहंडी रद्द करण्यात आल्या आहेत. दहीहंडीसाठी होणारा खर्च आता मीरा भाईंदर व ठाण्यातील नागरिकांसाठी 1 कोटी रुपयांची औषधे, सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप यावर केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या व ताप, सर्दी, खोकला आदी आजारांवर औषधे मोफत दिली जाणार आहेत.
शासनाने खासगी रुग्णालयांना शुल्क आकारणी बाबतचे निकष व दर ठरवून दिले असताना खासगी रुग्णालये मात्र कोरोना संकट काळात नागरिकांची अडवणूक करून त्यांना लुटत आहेत. त्याला स्थानिक पालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाचे संगनमत जबाबदार आहे. ही लूट थांबवली नाही तर या विरोधात केवळ तक्रारी करून थांबणार नाही वेळ पडल्यास आंदोलन करू असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"सत्तेच्या हव्यासापोटी देशात लागू केली आणीबाणी, एका रात्रीत संपूर्ण देशाचा केला तुरुंग"
CoronaVirus News : 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटीवर?, WHO ने दिला गंभीर इशारा
CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; गाठला नवा उच्चांक
बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान