शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

coronavirus: कोरोनाकाळात खासगी हाॅस्पिटलकडून रुग्णांच्या खिशावर कोट्यवधीचा दरोडा, दोषींवर कठोर कारवाईची मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 6:32 PM

कोरोना लढ्यात एकीकडे राज्य सरकार 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' अशी भावनिक साद नागरिकांना घालत असताना ठाण्यात माञ या उक्तीच्या विरोधात जात काही खासगी रुग्णालय व मेडिकल चालकांनी सर्वसामान्य रुग्णांची लूट सुरु केली होती.

ठाणे -  कोरोना उपचारानंतर अवाजवी बिल देत गोरगरिब रुग्णांचे खिसे कापणार्‍या खासगी रुग्णालयांना लगाम घालण्यासाठी मनसेने वाचा फोडल्यानंतर पालिका प्रशासनाने कोरोना रुग्णांचे बिल योग्य पध्दतीने तपासण्यासाठी  लेखापरिक्षकांची नेमणूक केली होती. यामध्ये तब्बल पावणे दोन कोटींची आक्षेपार्ह बिलांचा झोल समोर आला असून कोरोनाकाळात खासगी हाॅस्पिटलने रुग्णांच्या खिशावर दरोडा टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोषी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याची मनसेचे संदीप पाचंगे यांनी मागणी केली आहे.

कोरोना लढ्यात एकीकडे राज्यशासन 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' अशी भावनिक साद नागरिकांना घालत असताना ठाण्यात माञ या उक्तीच्या विरोधात जात काही खासगी रुग्णालय व मेडिकल चालकांनी सर्वसामान्य रुग्णांची लूट सुरु केली होती. कोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णालय प्रशासन वापरत असणारे पीपीई कीट थेट तिप्पट दराने रुग्णांच्या माथी मारले जात असल्याच्या  स्वस्तिक हॉस्पिटलच्या गलथान कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागअध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आवाज उठवला होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी पाचंगे यांच्याकडे त्यांची व्यथा मांडताच या प्रकरणी पालिका आणि एफडीए विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. रुग्णालय प्रशासनाचा बिलांबाबतचा भोंगळपणा रोखा, अशी मागणी संदीप पाचंगे यांनी ठाणे पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांची भेट घेत केली होती. त्यानुसार तात्काळ पालिका प्रशासनाने १५ कोविड रुग्णालयांकडून रुग्णांना दिल्या जाणार्‍या बिलांचे लेखापरिक्षण करण्यासाठी ८ कनिष्ठ लेखापरिक्षकांची नेमणूक केली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णांच्या बिलांबाबत ठरवून दिलेल्या निकषांनुसार बिल रुग्णालय प्रशासनाने दिले का, यावर या टीमची करडी नजर राहणार आहे. दैनंदिन किमान १०० बिलांची तपासणी पुर्ण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने या लेखापरिक्षकांना दिले होते. त्यानुसार १० जुलै ते २१ आॅगस्ट दरम्यान च्या उपचारासाठी पावणे दोन कोटींची आक्षेपार्ह बिले आढळली आहेत.एकूण प्राप्त देयके :- ४१०६तपासणी झालेली  :- ३३४७आक्षेपार्ह देयके     :- १३६२जादा आकारणी केलेली देयकांची रक्कम  :- १,८२,३९,७७६रूग्णांस परत केलेली रक्कम :- २६,६८,९६४ खुलाशानुसार मान्य केलेली रक्कम :- १५,२७,०१९हा अहवाल मनसेच्या हाती लागला असून पालिकेने अशा लुटारु रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसे विभागअध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे.

दंडात्मक कारवाई आवश्यकखासगी रुग्णालय व मेडिकलच्या लुटीच्या जाचातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची या निर्णयानंतर काही प्रमाणात निश्चितच सुटका होण्यास मदत होईल. माञ त्याहीपुढे जात पालिकेने अशा रुग्णालयांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई केल्यास अशा वृत्तीला निश्चितच चाप बसेल.- संदीप पाचंगे, विभागअध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ओवळा माजिवडा विधानसभा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेhospitalहॉस्पिटल