मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वात जास्त 33 रुग्ण आढळले असल्याने खळबळ उडाली आहे. पालिकेने रात्री पावणे अकरा वाजता या बाबतचा अहवाल दिला. यात वेस्टर्न पार्कच्या तय्यबा नगरमधील 14 दिवसांच्या नवजात मुलीचा त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 235 इतकी झालेली आहे .
पालिकेकडून नेहमीच अहवाल विलंबाने दिला जात आहे. कधीतर दुसऱ्या दिवशी अहवाल दिला जातो. शुक्रवारी रात्री पावणे 11च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात तब्बल 33 कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत शहरातील एका दिवसात सापडलेले हे सर्वात जास्त रुग्ण आहेत. इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण एका दिवसात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
भाईंदरच्या कस्तुरी पार्क, राहुल पार्क, मोदी पटेल मार्ग, शिवसेना गल्ली, राई शिवनेरी, नेहरू नगर, विनायक मंदिर जवळ, आनंद नगर - विमल डेअरी, न्यू गोल्डन नेस्ट, खारी गाव व ज्योती पार्क भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
तर मीरारोड च्या शांती नगर सेक्टर 3, कनकिया रोड, पूनम सागर, न्यू नुपूर कॉम्प्लेक्स, काशीमीरा, नित्यानंद नगर भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आता पर्यंत शहरात 7 कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत.