शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

CoronaVirus News: अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ‘केडीएमसी’त जास्त; सर्वाधिक मृत्यू ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:11 AM

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागण्यास सुरुवात झाली. त्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने आजघडीला जिल्ह्यातील बाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकीकडे वाढ होत असताना दुसरीकडे या आजारावर यशस्वी मात करून स्वगृही परतणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. असे असताना सध्या जिल्ह्यात कल्याण डोंबिवलीत उपचार घेणाºया रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९९ हजार १५८ वर पोहोचली आहे. त्यापैकी केवळ १५ हजार ३२९ रुग्ण उपचारार्थ दाखल असून, यामध्ये सर्वाधिक कल्याण डोंबिवलीतील सर्वाधिक चार हजार ३२९ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागण्यास सुरुवात झाली. त्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने आजघडीला जिल्ह्यातील बाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर आहे. असे असले तरी या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ९९ हजार १५८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था कोरोनाची लागण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. या उपाययोजनांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ८१ हजार ५२ रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून स्वगृही परतले आहेत. तसेच भिवंडी, उल्हासनगर यासारख्या कोरोनाबाधित शहरांमधील रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात येत असली तरी नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत मात्र हा आकडा अजूनही म्हणावा त्या प्रमाणात कमी झालेला नाही.रुग्ण कमी होईनाजिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर असलेल्या ठाणे महापालिकेला मागे टाकून कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक चार हजार ३२९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात तीन हजार ४७० रुग्ण उपचार घेत आहेत.ठाणे पालिका क्षेत्रात २८५७ रुग्ण उपचार घेत आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये १६२८, ठाणे ग्रामीणमध्ये १४८२, उल्हासनगमध्ये ६२९, अंबरनाथमध्ये ३७८, बदलापूरमध्ये ३३७ आणि भिवंडीत केवळ २१९ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या