कल्याण-कोरोनाशी मुकावला करण्यासाठी राज्य सरकारचे हात बळकट करण्याकरीता एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 लाख रुपयांचा धनादेश जमा करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे.
संघटनेचे अध्यक्ष शिंदे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आमदार शिंदे यांनी सांगितले की, कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सरकारने कोरोनाशी लढा देण्याकरीता उपाययोजना चांगल्या प्रकारे आखल्या आहेत. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी सरकारचे हात बळकट करणो गरजेचे आहे. राज्यातील 75 हजार औषध विक्रेते कोरोनाच्या विरोधातील लढय़ात सरकारच्या सोबत आहेत. सरकारला आर्थिक बळ देण्यासाठी 25 लाखाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे. संस्था दरवेळीस आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे. राज्यात पूर आला तेव्हा संस्थेच्या वती पूरग्रस्त भागाला मोठय़ा प्रमाणात औषध पुरवठा केला होता. राज्यावर अनेक संकटे येतात. त्यावेळी या संकटनांना सामना देण्यासाठी संस्था आपला खारीचा वाटा उचलत असते.
औषध विक्रेता संस्थेच्या आधी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यानी त्यांच्या खासदार निधीतून 50 लाखाचा निधी दिला आहे. कल्याण डोंबिवलीतील तीन नगरसेवकांनी त्यांचे तीन महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचे जाहिर केले आहे. आत्तार्पयत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 12 कोटी पेक्षा जास्त निधी जमा झाला आहे. सगळ्य़ांनी अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीची रक्कमेत वाढ होत राहिल. त्यातून कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारासाठी सोयी सुविधा पुरविणो शक्य होणार आहे.