शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

coronavirus: खाजगी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांकडून दररोज साडेबारा हजारांची आकारणी, नारायण पवार यांची आयुक्तांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 1:57 AM

रुपये आकारले जात आहेत. या प्रकाराबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी संताप व्यक्त करून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे संबंधित रुग्णालयांची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

ठाणे : कोरोनाचा संसर्ग झालेल्या मध्यवर्गीय रुग्णांना माफकदरात उपचार मिळण्यासाठी महापालिकेने ठरविलेले दर ठाण्यातील खाजगीरुग्णालयांनी फेटाळले आहेत. यामुळे कोरोनाबाधिताला दररोज किमान १२ हजार ५०० चा भुर्दंड बसत आहे. ९ ते १० पेशंट असलेल्या कक्षातील एका बेडच दर साडेचार हजार रुपये, तीन हजार ६५० रु पयांचे पीपीई कीट व मास्क, अडीच हजार रुपये डॉक्टर फी यांच्यासह औषधे व चाचण्यांसाठी दररोज १२ हजार ५००रुपये आकारले जात आहेत. या प्रकाराबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी संताप व्यक्त करून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे संबंधित रुग्णालयांची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.अमरावतीहून ठाण्यातील निवासस्थानी परतलेल्या एका ७१ वर्षांच्या वृद्धाची सतर्कता म्हणून नौपाडा येथील खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घाईघाईत घोडबंदर रोडवरील एका खाजगी रुग्णालयात नेले. ते मध्यमवर्गीय असल्यामुळे कुटुंबीयांनी सामान्य कक्षाची मागणी केली होती. मात्र, कोरोनासाठी केवळ आयसीयू व एचडीयू युनिट आहेत. सामान्य कक्ष अस्तित्वात नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना एचडीयू (हाय डिफेडन्सी युनिट) कक्षात दाखल केले. तेथील रूममध्ये ९ ते १० रुग्णांना ठेवले असल्याचे रु ग्णाचे म्हणणे आहे.तेथे त्यांच्यावर आठ दिवस उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याची कार्यवाही सुरू केली. डिस्चार्जआधी त्यांनी पुन्हा कोरोना चाचणीचा आग्रह धरला. मात्र, त्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करून तब्बल एक लाख एक हजार १३९ रुपयांचे बिल हाती सोपविले. त्याने रुग्णासह कुटुंबीयांनाही धक्का बसला. स्पेशल वॉर्ड वा आयसीयूमध्ये दाखल नसतानाही दररोज साडेबारा हजार रु पयांप्रमाणे बिल कसे आले, असा या रु ग्णाचा सवाल आहे. आपली कैफियत त्यांनी नगरसेवक पवार यांना सांगितली.त्यानुसार पवार यांनी यासंदर्भात ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना पत्रव्यवहार केला असून कारवाईची मागणी केली आहे. महापालिका आयुक्तांनी अधिकचे पैसे घेणाऱ्या हॉस्पिटलसाठी नियमावली तयार केली आहे. परंतु, त्याला हरताळ फासला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या प्रकाराची गंभीर दखल घेऊन घोडबंदर येथील संबंधित रुग्णालयावर कारवाई करावी. तसेच सर्व खाजगी रुग्णालयांमधील कारभाराची चौकशी करून ठाण्यातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही पवार यांनी आयुक्तांकडे केली आहे.एकाच पीपीई कीटवर रु ग्ण तपासणीपीपीई कीटसाठी दररोज तीन हजार ६७५ रु पये आकारले गेले. मात्र, माझ्या परिचित रु ग्णाच्या मते कक्षातील ९ ते १० जणांची डॉक्टरांकडून एकाच फेरीत तपासणी होत होती. अशा परिस्थितीत प्रत्येक रु ग्णाकडून पीपीई कीटसाठी शुल्क कसे आकारले जाते, असा सवाल त्यांनी केला. महापालिकेने सामान्य कक्षासाठी चार हजार रु पये दर निश्चित केल्याचीही संबंधित रु ग्णालयाला माहितीच नाही. तेथे केवळ आयसीयू व एचडीयू असे दोन कक्ष आहेत. महापालिकेचा कोणताही आदेश रु ग्णालयाकडे आला नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

एकाच पीपीई कीटवर रु ग्ण तपासणीपीपीई कीटसाठी दररोज तीन हजार ६७५ रु पये आकारले गेले. मात्र, माझ्या परिचित रु ग्णाच्या मते कक्षातील ९ ते १० जणांची डॉक्टरांकडून एकाच फेरीत तपासणी होत होती. अशा परिस्थितीत प्रत्येक रु ग्णाकडून पीपीई कीटसाठी शुल्क कसे आकारले जाते, असा सवाल त्यांनी केला. महापालिकेने सामान्य कक्षासाठी चार हजार रु पये दर निश्चित केल्याचीही संबंधित रु ग्णालयाला माहितीच नाही. तेथे केवळ आयसीयू व एचडीयू असे दोन कक्ष आहेत. महापालिकेचा कोणताही आदेश रु ग्णालयाकडे आला नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस