शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

coronavirus: कोरोनानंतर जीवनशैली बदलण्याची गरज, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांचे मत   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 3:58 AM

कोरोना डिप्रेसिंंग नाही, पण त्यासाठी पाळावयाचे नियम कठीण आहे. त्यामुळे घरात कुटुंबासोबत आनंदाने राहा, जुने छंद जोपासा, असे आवाहनही त्यांनी केले.

ठाणे : कोरोनानंतर शहरातील माणसांनी अजीवनशैली बदलण्याची गरज आहे. कोरोना कधी संपेल माहीत नाही. मास्क हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल डिस्टन्सिंंग हा शब्द चुकीचा आहे. आपण फिजिकल डिस्टन्सिंंग पाळले पाहिजे. दुर्दैवाने आपण ते अजिबात पाळत नाही, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक, मॅगेसेसे पुरस्कार विजेते, पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली. कोरोना डिप्रेसिंंग नाही, पण त्यासाठी पाळावयाचे नियम कठीण आहे. त्यामुळे घरात कुटुंबासोबत आनंदाने राहा, जुने छंद जोपासा, असे आवाहनही त्यांनी केले. आनंद विश्व गुरुकुल वरिष्ठ रात्र महाविद्यालय आयोजित संवाद मनाचा या कार्यक्रमात डॉ. आमटे यांची झूमअ‍ॅपद्वारे निवेदक मकरंद जोशी यांनी मुलाखत घेतली.डॉ. आमटे म्हणाले, आता आपण आपल्या गरजा कमी कराव्या. आज ज्याच्याकडे भरपूर पैसे आहे तो ही लॉकडाउनमध्येच आहे. आज सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. संकटकाळी ज्यांची आठवण होते ते कुलुपात आहेत. आज जास्त गरज आहे ती डॉक्टर, पोलिसांची. हे सगळे लढत आहेत. यांच्याबद्दल आपण कृतज्ञ राहू या. लॉकडाउनचे सर्व नियम आपण पाळावे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका हा ६५ वर्षांवरील व्यक्तीला अधिक असतो. तुलनेने लहान मुलांना तो कमी असतो. कोरोनावर लस शोधण्यात संपूर्ण जग मागे लागले आहे. तोपर्यंत आपण संयम ठेवला पाहिजे. प्राणी पिंजऱ्यात कसे राहतात याचा अनुभव आपण घेत आहोत.व्यसनमुक्त होण्याची संधीकोरोनामुळे आज सारे जग झू झाले असून प्राणी रस्त्यावर मोकळेपणाने फिरत आहेत. आज आपल्याला अन्नधान्याची सोय आहे. परंतु, आपण आपल्या जिभेचे चोचले कमी करावे. अलीकडे दारूची दुकाने उघडली तेव्हा ज्या प्रमाणात गर्दी झाली, ते पाहता यातूनही कोरोनाचा धोका वाढू शकतो. आपण ५० दिवस संयम ठेवला तर आणखीन पुढेही ठेवू शकतो. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला कोरोनाचा धोका अधिक असल्याचे आपण ऐकले आहे. त्यामुळे या काळात आपल्याला व्यसनमुक्त होता येईल का, हाही एक चांगला संदेश आहे. त्यामुळे आपण पुढील आयुष्य चांगले जगू शकू, असा सल्लाही त्यांनी दिला. सुरुवातीला हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या आठवणी त्यांनी उलगडल्या. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे