डोंबिवली : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्याला काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेच्या निमित्ताने डोंबिवलीकर एकत्र येतात; पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व स्वागतयात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. डोंबिवलीतील यात्रेतही २१ वर्षांनी खंड पडणार होता; पण त्यावर अनोखा पर्याय शोधत श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीने नववर्षाचे स्वागत हायटेक पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. अनेक नियोजित कार्यक्रम घरबसल्या डोंबिवलीकरांना श्री गणेश मंदिराची वेबसाइट, फेसबुक पेजवर पाहता येणार आहेत.नववर्ष स्वागतासाठी आठ दिवस आधीच कार्यक्रम सुरू होतात. यंदा हे कार्यक्रम तंत्रज्ञानाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. हे कार्यक्रम करताना सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. स्वागतयात्रेत दरवर्षी हजारोंच्या संख्येने सहभागी होणारे डोंबिवलीकर तेवढ्याच उत्साहाने यात सहभागी होणार आहेत. बहुतांश कार्यक्रम थेट आॅनलाइनद्वारे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे घरबसल्या त्यात मोबाइल, कॉम्प्युटर आणि इंटरनेटद्वारे सहभागी होता येणार आहे. त्यात आॅनलाइन वक्तृत्व स्पर्धा, बालवयोगटांसाठी आॅनलाइन वेशभूषा स्पर्धा होणार आहे, तसेच अनेक संस्था आपले विषय चित्ररथाद्वारे मांडतात, त्यांना हेच विषय आॅनलाइनद्वारे मांडण्याची संधी मिळणार आहे.अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित रवींद्र गोळे यांचे व्याख्यान आॅनलाइनद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. नववर्ष स्वागतयात्रा समितीने ठरविलेले शक्य तेवढे कार्यक्रम आॅनलाइन व शक्य असल्यास थेट प्रक्षेपित (लाइव्ह टेलिकास्ट) केले जातील. दरवर्षी संस्थानतर्फे सामाजिक आणि राष्ट्रीय विषय घेऊन यात्रा काढली जाते. यावर्षी त्याच धर्तीवर मंदिराने डोंबिवली शहरासाठी ठरवलेला संकल्प व्यक्तिगत नववर्ष संकल्प म्हणून अमलात येऊ शकतो का, तसेच ते आॅनलाइनद्वारे कसे करायचे, याचे प्रयत्न सुरू आहेत.कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज नववर्षाच्या स्वागतासाठी डोंबिवलीत येणार होते. मात्र, कोरोनामुळे ते इकडे येणार नसले तरी त्यांचे मार्गदर्शन लाइव्ह टेलिकास्ट करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. हे सर्व कार्यक्रम गणेश मंदिर संस्थानच्या वेबसाइटवर, फेसबुक पेजवर दाखविण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळचे गणेशपूजन, पालखीपूजन हेदेखील मंदिरातर्फे घरबसल्या लाइव्ह पाहता येणार आहे. सर्व उपक्रम समितीतील मंडळी एकमेकांशी आॅनलाइनद्वारे कनेक्ट राहून राबविणार आहेत. 'यात्रा ख-या अर्थाने ग्लोबलडोंबिवलीत २१ वर्षांपूर्वी सुरू झालेली स्वागतयात्रा एक पाऊल पुढे टाकत आता खºया अर्थाने ग्लोबल होणार आहे. गणेश मंदिर संस्थानच्या फेसबुक पेज, टिष्ट्वटर हॅण्डल, इंस्टा पेजवर अधिकाधिक नागरिकांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात येणार आहे.
Coronavirus : डोंबिवलीमध्ये यंदा नववर्षाचे होणार हायटेक स्वागत, ऑनलाइनद्वारे वक्तृत्व, वेशभूषा स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 1:30 AM