मीरा रोड : मीरा रोड येथील पालिकेचे इंदिरा गांधी प्रसूतिगृह आणि रुग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. तर दोन कर्मचाºयांचा अहवाल यायचा आहे. योग्य उपाययोजनांचा अभाव आणि पुरेसा साहित्य नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका वाढला आहे.वैद्यकीय कर्मचाºयांची कमतरता असल्याने अन्य विभागातील कर्मचारीही वैद्यकीय सेवा बजावत आहेत. सुरक्षारक्षक उपचारासाठी येणाºयांचे तापमान आणि आॅक्सिमीटरद्वारे तपासणी करत आहेत.प्रसूतिगृह, डायलिसिस केंद्र व दवाखान्यातील कर्मचाºयांना साधे मास्क देण्यात आले आहेत. हातमोजे, पीपीई किट दिलेले जात नाहीत. तरीही धोका पत्करून कर्मचारी काम करत असल्याच्या तक्रारी आहेत.जोशी रुग्णालयातील प्रसूतिगृह हे कोरोना रुग्णालय केल्याने बंद आहे त्यामुळे प्रसूतीसाठी गांधी रुग्णालयात महिलांची संख्या वाढली आहे . त्याच प्रमाणे डायलिसिस व बाह्योपचार साठी दैनंदिन येणारे रु ग्ण सुद्धा खूप असतात . परंतु या येणाºया रु ग्णांची कोरोना चाचणी केली गेलेली नसताना दुसरीकडे कर्मचाºयांना मात्र सुरक्षा साहित्य दिले जात नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.जोशी रुग्णालयातून डायलेसिससाठी येथे पाठवलेला रु ग्ण नंतर कोरोना पॉझिटिव्ह आल्याने केंद्र बंद ठेवावे लागले आहे. तसेच लिफ्ट बंद असल्याने रुग्णाला उचलून न्यावे लागल्याने कर्मचारी पॉझिटिव्ह झाला होता. अधिकारी आणि नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे कर्मचाºयांवरील ताण वाढत आहे.
CoronaVirus News: भाईंदर पालिकेच्या रुग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:06 AM