ठाणे : बुधवारी दिवसभरात ठाणे जिल्ह्यात ११८२ बाधितांसह २९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २४ हजार ६७४ तर मृतांची संख्या ८४१ झाली आहे. नवी मुंबईत सर्वाधिक ३२१ रुग्ण आढळले तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ५ हजार ३९३ तर मृतांची १८० वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात २२२ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या ४ हजार १९२ तर मृतांची ८५ झाली आहे. ठाणे पालिका हद्दीत १९७ बाधितांमुळे एकूण रुग्णसंख्या ६ हजार ८२७ वर गेली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या २५२ झाली. भिवंडी पालिका क्षेत्रात ९३ बाधितांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने संख्या एक हजार ३३२ तर मृतांची ८८ वर पोहोचली.मीरा-भार्इंदरमध्ये ९२ रुग्णांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ५७३ तर मृतांची ११९ झालीे. उल्हासनगरात ६९ रुग्णांची नोंद केल्याने बाधितांची संख्या एक हजार २७७ तर मृतांची ३६ आहे. अंबरनाथमध्ये ८४ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४०६ तर मृतांची ३४ झाली आहे.बदलापुरात २५ रु ग्णांच्या नोंदीने बाधितांची संख्या ६१८ तर मृतांची १३ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात ७९ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या १०५६ तर मृतांची संख्या ३४ वर गेली आहे.>वसई-विरारमध्ये ७ रुग्णांचा मृत्यू, १०५ नवीन रुग्णवसई : वसई-विरार शहरात बुधवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे पालिका हद्दीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०० झाली आहे. तर, १०५ नवे रुग्ण आढळले असून, ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांची संख्या २,४५३ वर पोहोचली आहे. तर ९२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १,१८२ नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या २४ हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 4:47 AM