लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ३२३ नवीन रुग्ण कोरोनामुळे बाधित झाले असून, ४० जणांचा यामध्ये मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ७० हजार ५१३ तर मृतांची एक हजार ९६९ इतकी झाल्याची माहिती मंगळवारी आरोग्य विभागाने दिली.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सोमवारपेक्षा मंगळवारी रुग्ण दाखल होण्याच्या संख्येत मोठी घट झाली. तरीही इतर ठिकाणच्या तुलनेत याठिकाणी सर्वाधिक २६८ रुग्ण नव्याने दाखल झाले, तर नऊ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या १६ हजार ६०२ तर मृतांची २६४ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये १८७ बाधितांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे याठिकाणी बाधितांची १६ हजार २१५ तर मृतांची संख्या ५७६ च्या घरात गेली. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातही २५४ नवीन रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. इथे आता बाधितांची ११ हजार ९६६, तर मृतांची संख्या ३५२ वर पोहोचली. मीरा-भार्इंदरमध्ये १५० रुग्ण नव्याने दाखल झाले असून सात जणांचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ८३४ तर मृतांची २३३ इतकी झाली. भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रात ९० जण बाधित झाले. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार २५६ वर पोहोचली. उल्हासनगरमध्ये १०० रु ग्णांची आणि चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. याठिकाणी बाधितांची संख्या पाच हजार ८६६ तर मृतांची ९२ वर पोहोचली आहे. अंबरनाथमध्ये ३९ रु ग्ण दाखल झाले तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार २१० तर मृतांची संख्या १२१ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ५८ रुग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे याठिकाणी आतापर्यंच्या बाधितांची संख्या दोन हजार ३१ इतकी झाली. ठाणे ग्रामीण भागांत १७७ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या चार हजार ५३३ तर मृतांची १२० वर पोहोचली आहे.