उल्हासनगर : उल्हासनगरात आज नवे १३७ कोरोना रुग्ण आढळून आली असून एकूण रुग्णाची संख्या १७६६ झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत ९८६ रुग्ण कोरोना मुक्त झाले तर ७३७ जनावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मोहनालकर यांनी दिली.
उल्हासनगरात सोमवारी तब्बल १३७ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णाची संख्या १७६६ झाली. त्यापैकी आज पर्यंत ९८६ जण कोरोना मुक्त झाले. तर ७३७ रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. एका जणाचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या ४३ झाली. शहरातील कॅम्प नं -१ मध्ये - ३०, कॅम्प नं-२ मध्ये -२४, कॅम्प नं -३ मध्ये -३७, कॅम्प नं -४ मध्ये -२६ तर कॅम्प नं -५ मध्ये २० असे एकूण १३७ नवे रुग्ण आढळून आले.
शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून झोपडपट्टी भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. याप्रकाराने महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले असून नवनियुक्त आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी शहरातील विविध कोविड रुग्णालयाची पाहणी केली. तसेच महापालिका मालमत्ते पैकी काही जागेवर कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे संकेत दिले