भिवंंडी : शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी गुरुवारपासून १५ दिवसांचा लॉकडाऊन करण्याच्या महापौर प्रतिभा पाटील यांच्या प्रस्तावाला विशेष महासभेने मंगळवारी मंजुरी दिली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.कोरोनाबाबतच्या उपाययोजनांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी नगरसेवक व विरोधकांकडून झाडण्यात आल्या. शहरातील कोविड रुग्णालयात असुविधांकडे मनपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. शहरात पाच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णाला उपचार मिळत नाहीत. बाधितांची यादी प्रशासनाकडे नसल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला. मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिकांचे चालक चार-पाच हजार रुपये मागत असल्याचा मुद्दा उपमहापौर मो. इम्रान वली खान यांनी उपस्थित केला. त्यावर मनपाला शासनाकडून पाच रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. काही रु ग्णवाहिका भाड्याने घेण्यात येणार असून एक रुग्णवाहिका शववाहिनीसाठी ठेवण्यात येणार आहे, असे मनपा आयुक्त डॉ. आष्टीकर यांनी सांगितले.
CoronaVirus News: भिवंडीत उद्यापासून १५ दिवस लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:11 AM