उल्हासनगर : उल्हासनगरात आज नवे १५९ कोरोना रुग्ण आढळून आली असून एकूण रुग्णाची संख्या २९६९ झाली. तर आजपर्यंत १५७४ रुग्ण कोरोना मुक्त झाले तर १३३८ जनावर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मोहनालकर यांनी दिली आहे.
उल्हासनगरात सोमवारी १५९ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णाची संख्या २९६९ झाली. त्यापैकी आज पर्यंत १५७४ जण कोरोना मुक्त झाले. तर १३३८ रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. एकूण मृत्यूची संख्या ५७ झाली आहे. शहरातील कॅम्प नं -१ मध्ये - ३०, कॅम्प नं-२ मध्ये -२४, कॅम्प नं -३ मध्ये -३६, कॅम्प नं -४ मध्ये -५३ तर कॅम्प नं -५ मध्ये १६ असे एकूण १५९ नवे रुग्ण आढळून आले.
शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत घट होताना दिसत नसून रुग्णावर उपचार कुठे करावे. असा प्रश्न महापालिका प्रशासना समोर पडला. शहरातील शांतीनगर, कुर्ला कॅम्प, सुभाष टेकडीसह झोपडपट्टीचे अनेक भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत.
आणखी बातम्या...
अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी
Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता
"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील"
चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत