ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. सोमवारीही एक हजार ७३९ रुग्ण नव्याने आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णसंंख्या एक लाख ४७ हजार ८४१ वर गेली आहे. तर, २८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या आता तीन हजार ९४९ झाली.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ४०३ रुग्ण नव्याने आढळल्याने रुग्णांची संख्या ३० हजार ६०१ वर पोहोचली. तर, आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत ९०१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत ७३४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी ५०० नवे रुग्ण आढळल्याने शहरात आता रुग्णसंख्या ३५ हजार ७३५ झाली. नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात ३४२ रुग्ण सापडले असून चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. उल्हासनगर परिसरात ४० नवे रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आठ हजार ३२० बाधितांची नोंद झाली आहे.भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात नऊ बाधित आढळले असून यामुळे बाधितांची संख्या चार हजार ५१४ झाली आहे. आतापर्यंत मृतांची संख्या २९५ कायम आहे. मीरा-भार्इंदरला २०३ रुग्णांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात १५ हजार ४१४ बाधितांसह ४७९ मृतांची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये ४१ रुग्णांची वाढ झाली असून एकाचाही मृत्यू झाला नाही.आतापर्यंत या शहरात बाधितांची संख्या पाच हजार ५२६, तर मृतांची संख्या २०६ आहे. बदलापूरमध्ये ८० नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ८६ झाली. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील गावखेड्यांमध्ये १२१ रुग्णांची वाढ झाली असून पाच मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या ११ हजार ६४०, तर मृतांची संख्या ३४४ झाली आहे.
CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे १७३९ रुग्ण सापडले, २८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 3:18 AM