लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना रुग्णाच्या संख्येत गुरु वारी देखिल वाढ झाल्याचे आढळले. अवघ्या २४ तासांमध्ये गुरु वारी एक हजार ९०९ बाधित रुग्णांची तर ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८ तर मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क्षेत्रात १६ जुलै रोजी देखिल पुन्हा सर्वाधिक ५२४ नविन कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या १४ हजार ५९८ तर मृतांची संख्या २२५ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात ४१३ बाधितांची तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ८३२ तर मृतांची संख्या ५४३ वर गेली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात २७३ रु ग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या दहा हजार ५४६ तर मृतांची संख्या ३२२ वर पोहचली आहे.मीरा भार्इंदरमध्ये १२५ रु ग्णांची नव्याने नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ७५ तर मृतांची संख्या २१३ इतकी झाली आहे. भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रामध्ये ६३ बाधितांची तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या ही दोन हजार ९६७ तर मृतांची संख्या १६७ वर पोहचली आहे. तसेच उल्हासनगरमध्येही गुरुवारी २०२ रुग्णांची नोंद झाली. सुदैवाने याठिकाणी गुरुवारी कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ४७ तर मृतांची संख्या ही ७४ अशी स्थिर राहिली आहे. अंबरनाथमध्येही नव्याने ४१ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ही दोन हजार ८७० इतकी झाली असून मृतांचा आकडाही १११ वर पोहचली आहे. त्याचबरोबर बदलापूरमध्ये ९० रुग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे बाधितांची संख्या ही एक हजार ७०३ इतकी झाली आहे. तर ठाणे ग्रामीणमध्ये १७८ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ग्रामीण भागात बाधितांची संख्या तीन हजार ७६० तर मृतांची संख्या ही ९९ वर पोहचली आहे.