लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सोमवारी आणखी तीन अधिकाºयांसह २० पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्याचवेळी सहा अधिका-यांसह २५ पोलिसांनी कोरोनावर मात केल्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बाजारपेठच्या कर्मचा-याचे मंगळवारी सहकारी पोलिसांनी जल्लोषात स्वागत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील महिला उपनिरीक्षकासह दोन अधिकारी आणि १७ कर्मचारी अशा २० पोलिसांना ६ जुलै रोजी लागण झाली. यामध्ये दोघे निजामपुरा तर एक महात्मा फुले पोलीस ठाण्यातील आहे. याशिवाय, शांतीनगरच्या पाच आणि महात्मा फुलेच्या दोन कर्मचारीही बाधित झाले. तसेच मुख्यालय, शीळडायघर, भोईवाडा, कापूरबावडी, आर्थिक गुन्हे, वाहतूक शाखा, नारपोली आणि भिवंडी येथील प्रत्येकी एकाचा यामध्ये समावेश आहे. सोमवारी एकाच दिवसात २० पोलिसांना लागण झाल्यामुळे बाधित पोलिसांची संख्या आता ६७३ च्या घरात गेली आहे.* दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी एकाच दिवसात सहा अधिकारी आणि १९ कर्मचारी २५ पोलिसांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे ही संख्याही ४६३ इतकी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
Coronavirus News: ठाण्यात एकाच दिवसात २५ पोलिसांनी केली कोरोनावर मात: आणखी २० पोलिसांना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 11:14 PM
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सोमवारी आणखी तीन अधिकाऱ्यांसह २० पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्याचवेळी सहा अधिकाऱ्यांसह २५ पोलिसांनी कोरोनावर मात केल्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्दे तीन अधिका-यांचा समावेशबाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हवालदाराचे सहका-यांनी केले स्वागत