ठाणे : जिल्ह्यात मंगळवारी एक हजार ५०३ नवीन बाधितांची तर ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५८ हजार ५०७ तर मृतांची संख्या एक हजार ६८९ झाली.मंगळवारी ठाणे पालिका क्षेत्रात ३४४ नव्या रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ठाण्यात बाधितांची संख्या १४ हजार १९ तर मृतांची संख्या ५२४ वर गेली आहे. कल्याण-डोंबिवलीत ३३५ रु ग्णांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या १३ हजार ५७६ तर मृतांची २०७ झाली. १०५ रु ग्णांसह आठ जणांच्या मृत्यूमुळे मीरा-भार्इंदरमध्ये बाधितांची संख्या पाच हजार ८५१ तर मृतांची २०७ झाली.पालकमंत्र्यांचे स्वीय साहाय्यकही बाधित राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय साहाय्यकालाही लागण झाली आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.वसई-विरारमध्येनऊ रु ग्णांचा मृत्यूवसई-विरार शहरात मंगळवारी नऊ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर २०९ नवीन रु ग्ण आढळले आहेत. याच वेळी ८५ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.रायगडमध्ये २९० रुग्णअलिबाग : जिल्ह्यात मंगळवारी २९० नव्या पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ८ हजार १७३ वर पोहोचली आहे, तर तिघांचा मृत्यू झाला.ृ२६८ रुग्ण कोरोनामुक्तनवी मुंबई : शहरात मंगळवारी २६८ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर, २३९ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या ९,९१७ झाली आहे. दिवसभरात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १५०३ नव्या रुग्णांसह ३५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 2:40 AM