शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १ हजार ३६८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, ४२ जणांच्या मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 8:22 PM

ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 407 रुग्णांची तर, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअंबरनाथमध्ये 44 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 358 झाली.

ठाणे :  ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत दररोज चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारप्रमाणे बुधवारीही रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. दिवसभरात एक हजार 368  रुग्णांची तर, 42 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील रुग्ण संख्या एक लाखाच्या पार गेली आहे.  जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या एक लाख एक हजार 576 तर, मृतांची संख्या आता दोन हजार 873 झाली आहे.  

ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 407 रुग्णांची तर, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 19 हजार 440 तर, मृतांची संख्या 486 वर पोहोचला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकाक्षेत्रात 368 रुग्णांची तर, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 23 हजार 217 तर, मृतांची संख्या 466 इतकी झाली आहे. 

ठाणे महानगर पालिका हद्दीत 199 बाधितांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 22 हजार 530 तर, मृतांची संख्या 713 वर गेली आहे. मीरा भाईंदरमध्ये 178 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 10 हजार 96 तर, मृतांची संख्या 328 इतकी झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात 19 बधीतांसह 4 मृत्यू झाला असून बाधितांची संख्या 3 हजार 826 तर, मृतांची संख्या 266 झाली. उल्हासनगर 27 रुग्णांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 212 तर, मृतांची संख्या 164 झाली आहे. 

अंबरनाथमध्ये 44 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 358 झाली.  बदलापूरमध्ये देखील 57 रुग्णांच्या नोंदीसह  1 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 215 तर, मृतांची संख्या 55 इतकी झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात 69 रुग्णांची तर, 5 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 682 तर, मृतांची संख्या 227 वर गेली आहे. 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस