ठाणे: ठाणे जिल्ह्यात कोरोना रविवारीही बाधित रुग्णांची संख्या एक हजार 345 तर, 38 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 30 हजार 289 तर, मृतांची संख्या 985 झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण चांगलाच वाढला आहे.
ठाणे महानगर पालिका हद्दीत 341 बाधितांची तर, 14 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 7 हजार 349 तर, मृतांची संख्या 296 वर गेली आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 369 रुग्णांसह 6 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 5 हजार 678 तर, मृतांची संख्या 107 इतकी झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेत 197 रुग्णांची तर, चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 6 हजार 200 तर, मृतांची संख्या 205 वर पोहोचला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 50 बधीतांसह 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार 740 तर, मृतांची संख्या 100 वर पोहोचली. त्यात मीरा भाईंदरमध्ये 116 रुग्णांसह 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 51 तर, मृतांची संख्या 139 इतकी झाली आहे.
उल्हासनगर 101 रुग्णांची तर, दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एका हजार 629 तर, मृतांची संख्या 41 झाली आहे. अंबरनाथमध्ये 45 रुग्णांची तर, दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 681 तर, मृतांची संख्या 40 झाली आहे. बदलापूरमध्ये 35 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 721 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 91 रुग्णांची तर, तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 421 तर, मृतांची संख्या 42 वर गेली आहे