ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी ५०० च्या खाली आली आहे. मधल्या काळात कमी होत जाणारी रुग्णासंख्या आता पुन्हा वाढू लागली असल्याचे रोजच्या आकडेवारी वरून दिसत आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यात ४०२ रुग्णांची तर ७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या २ लाख ३३ हजार ३२४ तर, मृतांची संख्या आता ५ हजार ७५१ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत १०५ बाधितांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ५२ हजार ६९४ तर, १२५४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ८० रुग्णांची तर, १ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. कल्याण डोंबिवलीत १०३ रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये २९ रुग्णांची नोंद झाली आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात एकही नवीन रुग्नाची नोंद झाली नाही. तसेच उल्हासनगरमध्ये २७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. अंबरनाथमध्येही १० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये ३४ रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात १४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ३२२ झाली आहे. तर मृतांचा आकडा ५६५ झाला आहे.