शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Coronavirus News: ठाणे जिल्हयात रविवारी दिवसभरात एक हजार ८७६ बाधितांसह ४७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 11:38 PM

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात रविवारी दिवसभरात बाधितांची संख्या एक हजार ८७६ तर ४७ जणांचा मृत्यु झाला.

ठळक मुद्देकोरोनाचा कहर सुरुचजिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२ हजार ४१८मृतांची संख्या एक हजार २५२

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात रविवारी दिवसभरात बाधितांची संख्या एक हजार ८७६ तर ४७ जणांचा मृत्यु झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२ हजार ४१८ तर मृतांची एक हजार २५२ इतकी झाली आहे.शनिवारप्रमाणे रविवारी देखिल कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक ४८२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची नऊ हजार ८६ तर मृतांची संख्या १४० च्या घरात पोहचली आहे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातही रविवारी ३७३ नविन रुग्णांची नोंद झाली. तर १६ जणांचा मृत्यू ओढवला. त्यामुळे बाधितांची संख्या दहा हजार ७३१ तर मृतांची संख्या ४०२ इतकी झाली. नवी मुंबई महापालिकेत १९१ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ५० तर मृतांची संख्या २४४ वर पोहोचली. मीरा भार्इंदरमध्ये ३०३ नव्या रुग्णांची भर पडली असून चौघांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ३१४ तर मृतांची संख्या १६२ इतकी झाली.भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातही ६९ जण बाधित झाले. तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ३१९ तर मृतांची संख्या १२० इतकी झाली आहे. उल्हासनगरमध्ये २५१ नविन रुग्णांची भर पडली. तर एकाचा मृत्यू झाल्याने दोन हजार ८१० बाधितांची तर मृतांची संख्या ५३ इतकी झाली. अंबरनाथमध्ये नव्याने ७४ जण बाधित झाले असून १२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बाधितांची दोन हजार १९६ तर मृतांची संख्या ७० वर पोहचली आहे. बदलापूरमध्ये २१ रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ९७३ इतकी झाली. तर ठाणे ग्रामीण भागात नव्याने ११२ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार १९२ तर मृतांची संख्या ६१ वर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस