ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ४८१ रुग्ण मंगळवारी आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख २९ हजार ५०० रुग्ण झाले आहेत. तर, सात रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ६९२ झाली आहे.
ठाणे परिसरात १०७ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५१ हजार ४२४ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता एक हजार २३८ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत १२० रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आता येथे ५४ हजार १६० बाधीत असून एक हजार ६१ मृतांची नोंद आहे.
उल्हासनगरात ३९ नवे रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात दहा हजार ८८१ रुग्ण संख्या असून मृतांची संख्या ३५३ झाली आहे. भिवंडी शहरात १० बाधीत आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. आता या शहरात बाधीत सहा हजार २९० झाले असून मृतांची संख्या ३४५ आहे. मीरा भाईंदरमध्येत ४२ रुग्णांची वाढ झाली असून एका मृत्यूची नोंद आज केली. आता बााधीत २४ हजार २२२ झाले आहेत, तर, मृत्यू ७५७ नोंदले आहेत.
अंबरनाथमध्ये १४ रुग्ण नव्याने वाढले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या सात हजार ८८३ झाली असून मृतांची संख्या २८९ आहे. बदलापूरमध्ये २२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या आट हजार ८६ झाली आहे. या शहरात मृत्यू नाही. त्यामुळे मृतांची संख्या ९८ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात १२ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता १८ हजार १८८ बाधितांची नोंद झालेली असून मृतांची संख्या ५६५ नोंदली आहे.