शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

CoronaVirus News: ठाण्यात ६२४ कोरोनाचे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 7:43 PM

अंबरनाथमध्ये नव्याने ३४ रुग्ण आढळले. तर एकही मृत्यू झाला नाही.

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे नव्याने ६२४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख १४ हजार ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात केवळ आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ४०९ झाली आहे.  ठाणे शहरात १६४ नवे रुग्ण आढळले आहेत. या शहरात ४७ हजार ४८२ रुग्णांची नोंद झाली आहे. आज तीन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार १६४ झाली आहे. कल्याण - डोंबिवली मनपात १६० रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात ५० हजार ६३३ रुग्ण बाधीत झालेले असून एक हजार दहा मृत्यू झाले आहेत. 

उल्हासनगरमध्ये २२ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या मनपात मृतांची संख्या ३४३ असून बाधितांची संख्या दहा हजार ३२३ झाली आहे. भिवंडीला आठ बधीत आढळून आले असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार ९९४ असून मृतांची संख्या ३३५ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये ५७ रुग्ण सापडले, एकही मृत्यू झाला नाही. या शहरात आता बाधितांची संख्या २२ हजार ८८४ असून मृतांची संख्या ७२६ झाली आहे

अंबरनाथमध्ये नव्याने ३४ रुग्ण आढळले. तर एकही मृत्यू झाला नाही. आता बाधितांची संख्या सात हजार ४१७ असून, मृतांची संख्या २७३ झाली आहे. बदलापूरला २५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत सात हजार ४६३ झाले आहे. या शहरात आजही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या ९८ कायम आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४२ रुग्णांची वाढ झाली असून एकाचाही मृत्यू झाला नाही. आता बाधीत १७ हजार ४९ आणि आतापर्यंत ५४५ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे