शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात ९२४ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 4:52 AM

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ९२४ बाधितांची तर ४१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ९२४ बाधितांची तर ४१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या २३ हजार ४९२ तर मृतांची ८१२ झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात सर्वाधिक २०२ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे तेथील बाधितांची संख्या ३ हजार ९७० तर मृतांची ८१ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ भिवंडी महापालिका क्षेत्रात १२२ बाधितांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे तेथील बाधितांची संख्या एक हजार २३९ तर मृतांची ८३ वर पोहोचली. ठाणे महानगरपालिका हद्दीत १८७ बाधितांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या ६ हजार ६३० वर गेली असून तर १० जणांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या २४२ झाली आहे. नवी मुंबई महापालिकेत १११ रु ग्णांची तर ४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ५ हजार ७२ झाली आहे.मीरा-भार्इंदरमध्ये ९४ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या २ हजार ४८१ तर मृतांची ११६ इतकी झाली आहे. उल्हासनगरात ८३ रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार २०८ तर मृतांची ८३ झाली आहे. अंबरनाथमध्ये ५३ रु ग्णांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ३२२ तर मृतांची ३४ झाली आहे.बदलापूरमध्ये २४ नव्या रु ग्णांची नोंद केल्याने बाधितांची संख्या ५९३ तर मृतांची १३ झाली आहे. तर ठाणे ग्रामीण भागात ४८ रुग्णांसह दोन मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ९७७ तर मृतांची ३०वर गेली आहे.वसई-विरारमध्ये१३९ नवीन रुग्णवसई-विरार शहरात मंगळवारी १३९ नवीन रुग्ण आढळून आले. चौघांचा मृत्यू झाला, तर ९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे पालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या २३४८वर पोहोचली आहे. एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या ९३ झाली आहे. तर कोरोनामुक्त संख्या १,३७० झाली आहे, तर एकूण ८८५ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस