लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी काही प्रमाणात घट झाल्याचे आढळले. गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ७०७ नविन बाधित रुग्णांची तर ४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६४ हजार १०५ तर मृतांची संख्या ही एक हजार ८२७ इतकी झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क्षेत्रात सर्वाधिक ४०७ रुग्ण १७ रु ग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार ५ तर, मृतांची संख्या २३१ झाली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रामध्ये नव्या ३१२ बाधितांची तर १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार १७४ तर मृतांची संख्या ५५७ वर गेली. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही २४० रुग्ण दाखल झाले असून आठ जणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आता दहा हजार ७८६ तर मृतांची संख्या ३३० वर पोहोचली आहे. मीरा भार्इंदरमध्ये १६५ रु ग्णांची तर दोघांच्या मृत्युमुळे बाधितांची संख्या सहा हजार २४० तर मृतांची संख्या २१५ वर पोहचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रातही बाधितांची ३९ तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार सहा तर मृतांची संख्या १७३ वर पोहोचली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातही २३७ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार २८४ तर मृतांची संख्या ही ७७ वर पोहचली आहे. अंबरनाथमध्ये ९६ रुग्ण नव्याने दाखल झाले. तर एकाचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ९६६ तसेच मृतांची संख्या ही ११२ वर पोहचली आहे. बदलापूरमध्ये ६४ रु ग्णांची नोंद झाली असून गेल्या अनेक दिवसांनी तिघांचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ७६७ तर मृतांची संख्या २६ झाली. ठाणे ग्रामीण भागात ११७ रु ग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार ८७७ तर, मृतांची संख्या १०६ वर गेली आहे.
जितेंद्र आव्हाड करणार प्लाझ्मा दानकोरोनातून बरे झाल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात रु ग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.