लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मंगला विनायक छापाणीमोहन (४६) या पोलीस नाईक महिला कर्मचाºयाचा सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. आतापर्यंत एका अधिकाºयासह २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून एक हजार ९६१ पोलीस बाधित झाले आहेत.ठाणेनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक मंगला यांची ३० आॅक्टोंबर रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना १ नोव्हेंबर रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. त्यातच फुफ्फुसामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा सफायर रुग्णालयात १६ नोव्हेंबर रोजी मृत्यु झाला. त्यांच्या मागे पती, आई आणि २१ वर्षीय मुलगी असा परिवार आहे. आतापर्यंत एक अधिकारी आणि २७ कर्मचारी तसेच एका वरिष्ठ श्रेणी लिपीकाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर २०० अधिकारी आणि एक हजार ७६१ कर्मचारी कोरोनामुळे बाधित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Coronavirus News: ठाण्यातील आणखी एका महिला पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यु
By जितेंद्र कालेकर | Published: November 18, 2020 12:56 AM
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मंगला विनायक छापाणीमोहन (४६) या पोलीस नाईक महिला कर्मचाऱ्याचा सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. आतापर्यंत २८ पोलिसांचा ठाण्यात कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
ठळक मुद्देठाण्यात पोलिसांच्या बळींची संख्या २८ एक हजार ९६१ पोलीस बाधित