लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वर्तकनगर येथील कोरस टॉवर सोसायटीच्या सार्वजनिक उद्यानामध्ये तोंडावर मास्क न घालता अंमली पदार्थाचे सेवन करणाºया साहिल कॅसबर आॅगस्टीन (२१, रा. वेदांत कॉम्पलेक्स, वर्तकनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरस टॉवर परिसरात साहील हा लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून गांजा सेवन करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक स्रेहल अडसुळे यांच्या पथकाने १९ जुलै रोजी रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध मनाई आदेशाचा भंग केल्यासह अंमली पदार्थ विरोधी कायदा, साथ प्रतिबंधक कायदा कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.* विशेष म्हणजे साहिलचे वडिल नामांकित नृत्य अकादमीचे चालक तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत. तत्कालीन पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला होता. मात्र, मुलगा अशा तºहेने अमली पदार्थाच्या आहारी गेल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
Coronavirus News: सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:50 PM
सार्वजनिक उद्यानामध्ये तोंडावर मास्क न घालता अंमली पदार्थाचे सेवन करणाºया साहिल कॅसबर आॅगस्टीन (२१, रा. वेदांत कॉम्पलेक्स, वर्तकनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध मनाई आदेशाचा भंग केल्यासह अंमली पदार्थ विरोधी कायदा, साथ प्रतिबंधक कायदा कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देवर्तकनगर पोलिसांची कारवाईअंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल