शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

CoronaVirus News: ‘कोरोनाचा १५ दिवसांत एकही रुग्ण नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:40 AM

मनपा हद्दीतील झोपडपट्ट्या, चाळवजा वस्ती येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त होते. मात्र, १५ दिवसांत तेथे एकही रुग्ण आढळलेला नाही

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हॉटस्पॉट असलेले भाग क्वारंटाइन झोन म्हणून घोषित केले होते. मात्र, मागील १५ दिवसांत ४५ विभागात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. ही समाधानकारक बाब असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.मनपा हद्दीतील झोपडपट्ट्या, चाळवजा वस्ती येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त होते. मात्र, १५ दिवसांत तेथे एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यात प्रामुख्याने क्रांतीनगर, ज्योतीनगर आदी चाळ व झोपडीपट्टी प्रभाग आहेत. त्यामुळे हे प्रभाग हॉटस्पॉटच्या यादीतून वगळले आहेत.सध्या दिवसाला अ‍ॅण्टीजेनच्या ७०० टेस्ट केल्या जात आहेत. तर, आतापर्यंत आठ हजार ३८१ जणांची अ‍ॅण्टीजेन टेस्ट केली आहे. फॅमिली डॉक्टर कोविड फायटर संकल्पनेला खाजगी डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत आहे. या डॉक्टरांनी आतापर्यंत चार हजार ३०० जणांची अ‍ॅण्टीजेन टेस्ट केली आहे. अ‍ॅण्टीजेन व स्वॅब अशा दोन्ही प्रकारच्या टेस्ट मिळून ५७ हजार ८२८ जणांची टेस्ट केली आहे. स्वॅब टेस्टींगचे प्रमाण हे ८६ टक्के तर, अ‍ॅण्टीजेन टेस्टचे प्रमाण १४ टक्के आहे. दर, दिवसाला एक हजार अ‍ॅण्टीजेन टेस्ट व दीड हजार स्वॅब टेस्ट करण्याचे उद्दीष्ट असून, त्या माध्यमातून कोरोना शून्य रुग्ण संख्येवर आणण्याचे ध्येय ठेवले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.आठ जणांचा मृत्यूकेडीएमसी हद्दीत बुधवारी कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ४६६ झाली आहे. दुसरीकडे नवीन ३६८ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २२,२१७ वर पोहोचली आहे. सध्या चार हजार १९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत १८,५६१ रुग्ण बरे झाले आहेत. २४ तासांत २३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेतील अग्निशमन दलाच्या बंबावरील चालक व परिवहन उपक्रमातील वाहक या दोघांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या