लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईकाचा मृत्युही कोरोनामुळे झाल्याचा अहवाल बुधवारी आला आहे. त्यामुळे कोरोनामुळे ठाणे शहर पोलिसांमधील बळींची संख्या तीन तर जिल्हयात चार झाली आहे. बुधवारी आणखी आठ जणांना लागण झाल्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता ३८९ इतकी झाली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय पोलीस नाईक यांना श्वसनाचा आणि छातीत दुखण्याच्या कारणामुळे १९ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा ह्यदयविकाराने मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. त्यावेळी त्यांचा स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचाच अहवाल २४ जून रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्यांचाही मृत्यु कोरोनामुळे झाल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, मुख्यालयातील दोन नाईकांना मंगळवारी लागण झाली असून त्यांना सफायर आणि वेदांत रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापाठोपाठ डायघर पोलीस ठाण्याच्याही एक महिलेसह दोघांना कोरोनामुळे २३ जून रोजी निआॅन रुग्णालयात दाखल करावे लागले. तर भिवंडीच्या दोन कर्मचाऱ्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही दोन वेगवेगळया रुग्णालयात दाखल करावे लागले. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि आर्थिक गुन्हे शाखेचे जमादार यांनाही २३ जून रोजी लागण झाली. त्यांच्यापैकी उपनिरीक्षकाला जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामाकेअरमध्ये तर जमादार यांना ठाण्याच्या कळवा येथील सफायर रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.* आतापर्यंत ३९ अधिकारी आणि ३५० कर्मचारी अशा ३८९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून २९३ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.मानपाडा येथील मृत पोलिसाच्या संपर्कातील तसेच मंगळवारी अहवाल आलेल्या आठ जणांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Coronavirus News: कोरोनामुळेच झाला डोंबिवलीतील ‘त्या’ पोलिसाचा मृत्यु
By जितेंद्र कालेकर | Published: June 24, 2020 11:57 PM
कोरोनामुळेच डोंबिवलीतील ‘त्या’ पोलिसाचाही मृत्यु झाल्याचा अहवाल बुधवारी आला. त्यामुळे कोरोनामुळे ठाणे शहर पोलिसांमधील बळींची संख्या तीन तर जिल्हयात चार झाली आहे.
ठळक मुद्देआतापर्यंत ३८९ पोलिसांना बाधाएकाच दिवसात आठ जणांना लागण मुख्यालयाच्या आणखी दोघांचा समावेश