लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोलीस आयुक्तांच्या पाठोपाठ डोंबिवलीच्या तसेच विशेष शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांसह तीन अधिकारी आणि ११ कर्मचारी अशा १४ पोलिसांना बुधवारी कोरोनाची लागण झाली. सध्या २० कर्मचारी हे घरी तर दोघांना केंद्रामध्ये कॉरंटाईन करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांमधील कोरोनाचे प्रमाण हे अगदी अत्यल्प झाले होते. आता यात पुन्हा वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यावर मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांनाच आता दोन सहायक पोलीस आयुक्त आणि उल्हासनगर नियंत्रण कक्षाचे एक सहायक पोलीस निरीक्षकही कोरोनामुळे बाधित झाले आहेत. त्याचबरोबर राबोडी, बिनतारी संदेश विभाग, खडकपाडा, बाजारपेठ आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. तर मुख्यालय आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन कर्मचारी बाधित झाले आहेत. या सर्वांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.* आतापर्यंत १३७ अधिकाऱ्यांसह एक हजार २१८ पोलीस बाधित झाले असून एक हजार २१४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २० कर्मचा-यांना घरी तर दोघांना केंद्रामध्ये कॉरंटाईन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Coronavirus News: ठाण्यातील दोन सहाय्यक आयुक्तांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:33 PM
डोंबिवलीच्या तसेच विशेष शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांसह तीन अधिकारी आणि ११ कर्मचारी अशा १४ पोलिसांना बुधवारी कोरोनाची लागण झाली. पोलिसांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
ठळक मुद्दे२२ पोलिसांना केले कॉरंटाईन पोलिसांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव