शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

CoronaVirus News: चाचण्या वाढवूनही ठाण्यात नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 1:04 AM

पालिकेच्या प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, मृत्युदरात घसरण

- अजित मांडके ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचण्यांचे दिवसाचे प्रमाण वाढवून ७,७०० च्या घरात आले आहे. दुसरीकडे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण नऊ टक्क्यांनी घटले आहे. यापूर्वी नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण २० टक्क्यांवर पोहोचले होते. ते आता ११ टक्क्यांवर आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवरून ८८.२० टक्कयांवर आले आहे.ठाण्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८८ दिवसांवर आला आहे. मृत्युदर २.६४ टक्के आहे. विशेष म्हणजे ठाणे महापालिका नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकांपेक्षा अ‍ॅण्टीजेन टेस्ट करण्यातही पुढे असून हा आकडा दिवसाकाठी ७७०० च्या घरात आला आहे. सप्टेंबर महिन्यात १० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असले, तरी आठ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत ३९ हजार ६९४ केसेस आढळल्या आहेत. त्यातील ३५ हजार ०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ३६३५ एवढी आहे.आतापर्यंत महापालिका हद्दीत कोरोनामुळे १०४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला मृत्युदर हा ५.२० टक्क्यांच्या आसपास होता. तो आता २.६४ टक्क्यांवर आला आहे. राज्याचा मृत्युदर हा २.६६ टक्के असून ठाण्याने मृत्युदरही रोखण्यात यश मिळविले आहे. आतापर्यंत तीन लाख ७० हजार ७०६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात ३९ हजार ६९४ रुग्ण आढळले आहेत.३६३५ रुग्णांवर ठाण्यात उपचार सुरूसध्या उपचार घेतलेल्या ३६३५ रुग्णांमध्ये लक्षणे असलेले रुग्ण १४५३ व लक्षणे नसलेले रुग्ण १९०६ आहेत. गंभीर रुग्ण २७६ असून आयसीयूमध्ये १६७, व्हेंटिलेटरवर १०९, पालिकेच्या विविध हॉस्पिटलमध्ये १६११, होम क्वारंटाइन १६३३ आहेत.मृत्युदर कमी करणे, डिस्चार्ज रेट, चाचण्या वाढविणे आदींवर काम करीत आहोत. त्यामुळे मृत्युदर कमी झालेला आहे. प्रत्येक  रुग्णाची माहिती घेतली जात आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केल्यामुळेच शहराचे चित्र बदलले.- डॉ. विपिन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या