शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Coronavirus News: ठाण्यातील कोरोना बाधित वकीलांसाठी जिल्हा संघटनेने जमा केला दहा लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 1:02 AM

ठाणे जिल्हयात आतापर्यंत दहा वकिलांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर ठाणे शहरातील दहा वकिल हे कोरोनाशी लढा देत आहेत. दोन वकिलांनी कोरोनावर मात केली. पण त्यांना लाखोंची बिले हातात पडली. अशावेळी आपल्या सहकाऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ठाणे जिल्हा वकिल संघटनेने पुढाकार घेतला आहे. राज्यातील असा पहिलाच उपक्रम असून संघटनेने आतापर्यंत दहा लाखांचा निधी जमा केला आहे.

ठळक मुद्देराज्यातील पहिलाच अनोखा उपक्रमठाणे जिल्हा वकील संघटनेने दिले योगदान

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: जिल्हयात आतापर्यंत दहा वकिलांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून सध्या दहा वकिलांना बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित वकीलांबरोबरच गरजू वकीलांसाठी ठाणे जिल्हा वकील संघटनेने वेळीच सकारात्मक पाऊल उचलून एक अनोखा उपक्र म हाती घेतला आहे. नामांकित वकिलांनी मोठया रक्कमा देण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच जवळपास दहा लाखांचा निधी जमा झाला आहे. या उपक्र मांतर्गत २५ लाखांचा निधी उभारण्याचे उदिष्ट संघटनेने डोळयासमोर ठेवेल्याची माहिती सूत्रांनी दिली.अशाप्रकारे कोरोनासारख्या संकटाच्या काळात आपल्याच सहकाऱ्यांच्या मदतीसाठी धाऊन जाणारी ठाणे जिल्हा वकील संघटना ही राज्यातील पहिलीच संघटना ठरणार आहे. ठाणे जिल्हा वकील संघटनेने कोरोना बाधीत वकील तसेच गरजू वकिलांना मदतीसाठी २८ जून रोजी एका विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी सभासदांनी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत कदम यांच्या आवाहनाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देऊन एक मोठा निधी उभारण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये दहा लाख रु पयांपेक्षा अधिक निधी जमा करुन गरजू सहकाºयांच्या प्रती जबाबदारीची जाणीव वकीलांनी व्यक्त केली. यावेळी अ‍ॅड. कदम यांनी स्वत: दिड लाख रुपयांचे योगदान देण्याचे घोषित केले. त्यापाठोपाठ ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण, अ‍ॅड. शैलेश सडेकर यांनी प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे मान्य केले. निधी उभारण्यासठी कनिष्ठ वकील सभासदांनीही यथाशक्ती आपले योगदान दिले.या सभेमध्ये कोरोनावर मात केलेल्या दोन वकिलांचाही समावेश होता. त्यांच्यापैकी एकाला संपूर्ण कुटूंबासह सात लाखांचा खर्च सोसावा लागला. त्यामुळेच सर्वांनी अशी मदत जमा करण्याचा निश्चय केला. सभेत १३३ सदस्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील ८० वकिलांनी मदतीचा हात पुढे केला. या सभेला अनुपस्थित ज्येष्ठ तसेच कनिष्ठ वकिलांना या कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून त्याद्वारे एक मोठा निधी उभारण्यात येईल. हा निधी ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या जवळपास चार हजारांहून अधिक वकील सभासदांसाठी उपयोगात आणला जाणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. 

‘‘ठाणे शहरात दहा वकील कोरोनामुळे बाधित असून जिल्हयात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यु झाला आहे. रुग्णालयाच्या बिलासाठी मोठी रककम कशी जमा करणार हा कनिष्ठ वकिलांपुढे प्रश्न होता. त्यामुळे कोरोनाबाधितांनी आवाहन केल्यानंतर अशी मदत उभी करण्याचे ठरले. अशा प्रकारे वकीलांसाठी मदत उभा करण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. ’’अ‍ॅड. प्रशांत कदम, अध्यक्ष, ठाणे शहर वकील संघटना 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस