अजित मांडके ठाणे : गेल्या १५ दिवसांमध्ये शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र, रुग्ण दरवाढीचा (दुप्पट होण्याचा वेग) रेट १५ दिवसांपूर्वी १० टक्क्यांवर होता. तो आता सुधारून तब्बल २८.३ टक्क्यांवर आला आहे. लोकमान्यनगर, वागळे इस्टेट आणि मुंब्रा हे तीन रेड झोन होते. परंतु, याठिकाणी दरवाढीचा रेट कमालीचा वाढला आहे. लोकमान्यनगर भागात तो ४७.४ टक्के, वागळे प्रभाग समितीत ४०.९ टक्के आणि मुंब्य्रात ३९.९ टक्के झाला आहे. ठाणेकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे. एकूणच १५ दिवसांपूर्वी रुग्ण दरवाढ ही १० दिवसांवर होती. ती आता २९ दिवसांवर आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ५७ टक्क्यांवर आले आहे. तर, मृत्यूदर ३.५ टक्क्यांवर आला असला, तरी तो महाराष्टÑ राज्यापेक्षा कमी असल्याची माहिती आयुक्त विजय सिंघल यांनी लोकमतला दिली.गेल्या काही दिवसांत शहरात कोरोनाची संख्या ही कमालीची वाढली आहे. परंतु, रुग्ण दरवाढीचा वेग २९ दिवसांवर नेण्यात आम्हाला यश आले आहे. रविवारपर्यंत ठाणे शहरात ६२९६ कोरोनाबाधित आढळले आहेत. आतापर्यंत २०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, यातही मागील काही दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही ३०९१ एवढी झाली आहे. तर, प्रत्यक्ष उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ही २९९७ एवढी आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे आता ५७ टक्कयांवर आले आहे. त्यामुळे निश्चितच ही ठाण्यासाठी समाधानकारक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.>या उपाययोजनांमुळे रुग्णवाढ झाली कमीकोरोना दरवाढीचा वेग वाढत असताना महापालिकेने केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमुळे कोरोना वाढण्याचा कालावधी हा अवघ्या १५ दिवसांत १० दिवसांवरून २९ दिवसांवर आला आहे. यामध्ये कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना तत्काळ क्वारंटाइन करणे, एकाच्या बदल्यात १७ जणांना क्वारंटाइन करणे, हायरिस्कमधील रुग्णांची साखळी तोडणे, यासाठी टीम तयार करून ज्या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण वाढत आहे, त्याठिकाणी हे काम करण्यात आले आहे. तसेच आता प्रत्येक दिवशी घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करण्याचे प्रमाण ३० हजार झाले आहे. त्यामध्ये ताप सर्वेक्षणही केले जात आहे. तसेच आॅक्सिजनची मात्राही तपासली जात आहे. त्यातून ज्यांना त्रास वाटत असेल, त्यांना तत्काळ क्वारंटाइन करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या सर्वांमुळे साखळी तोडण्यात मदत झाल्याचेही सिंघल यांनी स्पष्ट केले.>मुंबई मनपाच्या टास्कफोर्ससोबत कामतपासणीचे प्रमाणदेखील शहरात उत्तम असून, तपासणी करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीत जीआयआयएस प्रणाली कार्यान्वित केली आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५७ टक्कयांवर आले आहे. तर, मृत्यूदर हा महाराष्टÑापेक्षा ३.५० टक्के एवढा आहे. तो रोखण्यासाठी मुंबईतील टास्कफोर्सबरोबर महापालिक ा टास्कफोर्स काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी गुणाकाराने रुग्णवाढीचा (डबलिंगचा रेटचा कालावधीदेखील वाढला आहे. १५ दिवसांपूर्वी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १० दिवसांचा होता. त्यामुळे गुणाकाराने रुग्ण वाढल्याचे दिसून आले होते. परंतु, मागील काही दिवसांत आता हाच डबलिंगचा दर २८.३ दिवसांवर गेला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.>लोकमान्य-सावरकरनगरसह मुंब्य्रात समाधानकारक प्रगतीप्रभाग समितींचा विचार केल्यास लोकमान्य-सावरकरनगरमध्ये तो आता ४७.४ टक्के एवढा झाला आहे. याचाच अर्थ येथे रुग्णवाढ कमी करण्यात महापालिकेला यश आले आहे. तर, मुंब्य्रातही रुग्ण दरवाढीचा वेग मागील १० दिवसांत कमी झाल्याने रुग्ण दुप्पट होण्याचा रेट ३९.९ टक्के एवढा झाला आहे. दिव्यातही तो २६.१, वागळे इस्टेटमध्ये ४०.९, नौपाडा-कोपरीमध्ये २२.२, वर्तकनगर २१.६, उथळसर २८.७, कळवा १९.८, माजिवडा-मानपाडामध्ये डबलिंगचा रेट १५.२ टक्के एवढा आहे. एकूणच लोकमान्य, वागळे, मुंब्रा या प्रभाग समितींमधून कोरोनाबाधितांच्या डबलिंग रेटचा कालावधी हा आता वाढू लागल्याने समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
CoronaVirus News : रुग्ण दुपटीचा कालावधी १० दिवसांवरून ३० दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:19 AM