शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

CoronaVirus News: ठाण्यातील पहिला पॉझिटिव्ह ठणठणीत; स्वत:सह कुटुंबाचीही घेतोय काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 11:51 PM

आरोग्य यंत्रणेचे मानले आभार : नागरिकांना नियम पाळण्याचे केले आवाहन

- अजित मांडकेठाणे :  कोरोना आता कमी होताना दिसत आहे, परंतु ठाण्यात पहिला रुग्ण १२ मार्चला आढळला होता. आता हा रुग्ण ठणठणीत असून, तो स्वत:सह आपल्या कुटुंबाचीही तेवढीच काळजी घेत आहे, तसेच इतरांनाही कोरोनापासून वाचण्याचे उपाय सुचवित आहे. मात्र, त्याच्या मनात आजही कोरोनाची भीती घर करून आहे.     मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर २० दिवस उपचार करण्यात आले. तो ३१ मार्चला ठाण्यात घरी आला होता, परंतु उपचारानंतरही त्याला व त्याच्या कुटुंबांला रुग्णालय प्रशासनाने १४ दिवस होम क्वारंटाइन केले होते. कस्तुरबा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट १२ मार्चला पॉझिटिव्ह आला. रुग्णालयात डॉक्टर येऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस करीत होते. त्यानंतर, काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढली व डॉक्टरांवरील ताणही वाढला, परंतु त्यातून रुग्णालय प्रशासनाकडून योग्य वेळी औषध, गरम पाणी देणे, जेवणाचे डबे पुरविणे अशा सर्व सोयी पुरविल्या होत्या.  त्यामुळे तो  त्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो. पहिला रुग्ण कसा ट्रेस झाला? उपचार कुठे घेतलेघोडबंदर भागात राहणारा ३५ वर्षीय नागरिक परदेशातून ९ मार्चला भारतात आला. तेव्हा तो जेथून आला होता, त्या देशाचे नाव प्रशासनाच्या यादीत नव्हते. त्याच्यात लक्षणे न दिसल्याने त्याला घरी जाऊ दिले. परंतु, पत्नी, दोन मुलांपासून त्याने दुसऱ्या खोलीत स्वत:लाच क्वारंटाइन केले होते. त्यानंतर, ११ मार्चला त्याने थेट कस्तुरबा रुग्णालय गाठले. तेथे तपासणीत तो पॉझिटिव्ह आला.कुटुंबात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाहीया रुग्णाच्या घरातील दोन मुले आणि त्याच्या पत्नीलाही ॲम्बुलन्सद्वारे रुग्णालयात आणले. त्यांचीही कोविड चाचणी केली. सुदैवाने त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. रुग्णाने स्वत: घेतलेल्या खबरदारीमुळेच त्यांच्या घरातील इतर कोणीही पॉझिटिव्ह आले नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबाला एक प्रकारे मोठा दिलासा मिळाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या