शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात १७९३ बाधितांसह सर्वाधिक ५० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 11:33 PM

ठाणे जिल्हयात गुरु वारी कोरोनाच्या एक हजार ७९३ रुग्णांची नोंद झाली. तर ५० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हाभर बाधितांची संख्या आता ४८ हजार ८५६ तर मृतांची संख्या एक हजार ४५४ इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कासारवडवली पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या मृत्युमुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलिसांच्या मृत्युची संख्याही पाचवर पोहचली आहे.

ठळक मुद्देपोलीस हवालदाराचाही मृत्यू केडीएमसीमध्ये बाधितांची संख्या झाली दहा हजार ९३१ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात ३४८ नवे रुग्ण तर १६जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हयातील बहुतांश भागात लॉकडाऊन केले आहे. तरीही गुरु वारी २४ तासांमध्ये जिल्ह्यात एक हजार ७९३ कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली. तर ५० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हाभर बाधितांची संख्या ४८ हजार ८५६ तर मृतांची संख्या एक हजार ४५४ इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गुरुवारी सर्वाधिक ५८० रुग्ण दाखल झाले तर सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या ही दहा हजार ९३१ तर मृत्यूची संख्या १६४ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात ३४८ नवे रुग्ण नोंदविले गेले असून १६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या १२ हजार तर मृतांची संख्या ४६५ वर पोहचली आहे. त्याचबरोबरच नवी मुंबईमध्ये २३९ रुग्ण दाखल झाले. तर नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. इथे आता आठ हजार ५९८ इतकी बाधितांची संख्या झाली असून मृतांची संख्या २७८ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १८५ रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आता चार हजार ९९३ तर १७६ इतकी मृतांची संख्या झाली. भिवंडी महापालिका क्षेत्रामध्ये ५१ बाधितांची तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे दोन हजार ५८३ बाधितांची तर मृतांची संख्या १३४ वर पोहचली आहे. उल्हासनगरमध्ये नव्याने १६४ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने याठिकाणी बाधितांची तीन हजार ४२४ तर मृतांची संख्या ६१ झाली. अंबरनाथमध्ये ५० रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ४२८ तर मृतांची संख्या ८४ वर पोहचली आहे. बदलापूरमध्ये ३६ नवे रुग्ण दाखल झाले. तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार १९४ तर मृतांची संख्या २० झाली. त्याचप्रमाणे ठाणे ग्रामीण भागात १४० रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूमुळे बाधितांची संख्या दोन हजार ७३२ तर मृतांची संख्या ७२ वर पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली............................* आयुक्तालयात आणखी एका पोलिसांचा गेला बळीठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्यातील ५३ वर्षीय पोलीस हवालदाराचा कोरोनावरील उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आयुक्तालयात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ८ जुलै रोजी दोन अधिकाऱ्यांसह आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयातील चौघांना क्वॉरंटाईन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य