- हुसेन मेमन
जव्हारमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी दि.29 जून मध्य रात्री पासुन ते दि. 8 जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा व बँका सोडून सर्व प्रकारे हालचाली करणेसाठी मनाई आदेश सोमवारी सायंकाळी उशिरा पारीत केले आहेत.
कोविड -19 चा बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेतील अत्यावश्यक सेवा वगळता व बँकांनी टोकण पद्धतीने कामकाज सुरू ठेवणे व बाकी सर्व हालचाली दि. 30 जून ते 8 जुलै असे सलग 10 दिवस बाजारपेठ बंद करण्याचे आदेश पारीत केले असून, अचानक मनाई आदेश लागू केल्यामुळे जव्हारमध्ये धांदल उडाली असून, असा एकतर्फी निर्णय का घेण्यात आला असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत.
दरम्यान कोरोनाचा आकडा 103 पार झाला असुन ही चिंतेची बाब असल्याने तसेच जव्हारमध्ये वाढत प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेलता असल्याचे बोलले जात आहे.