कल्याण : केडीएमसीने ३७ कोरोना हॉटस्पॉटमध्ये ३१ आॅक्टोबरपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवले असून, त्याबाबतची अधिसूचना मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी काढली आहे.हॉटस्पॉट क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ दरम्यान सुरू राहतील. ३७ हॉटस्पॉटमध्ये मांडा, टिटवाळा, शहाड, बारावे गोदरेज हिल, खडकपाडा, वायलेनगर, आधारवाडी, रामबाग, सिद्धेश्वर आळी, बैलबाजार, लोकग्राम, लक्ष्मीबाग, संतोषनगर, विजयनगर, आमराई, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, भोपर, संदप, भगवाननगर, कांचनगाव खंबाळपाडा, सारस्वत कॉलनी, पाथर्ली गावठाण, अंबिकानगर, गोग्रासवाडी, बावनचाळ, गरिबाचावाडा, जयहिंद कॉलनी, विष्णूनगर, कोपर रोड, जुनी डोंबिवली, कोपरगाव, म्हात्रेनगर, रघुवीरनगर, दत्तनगर, सुनीलनगर, तुकारामनगर, आजदे, पिसवली या विभागांचा समावेश आहे.मनपा हद्दीत कोरोनाची सुरुवात झाली, तेव्हा १० हॉटस्पॉट होते. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत त्यात ४५ पर्यंत वाढ झाली. आता त्यांची संख्या ३७ पर्यंत घटली आहे.दरम्यान, नव्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र, ५ आॅक्टोबरपासून हॉटेल, बार हे सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत ५० टक्के क्षमतेनुसार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाला सहा फुटांचे अंतर पाळावे लगणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांच्या विरोधात दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना जपून वावरावे लागणार आहे.पावणेदोन लाखांचा दंड वसूलसध्या मनपा हद्दीत मास्क न घालता वावरणाºया नागरिकांकडून दंडवसुलीची जोरदार मोहीम सुरू आहे. मास्क न वापरणाºया ३४९ जणांकडून गुरुवारी महापालिकेच्या कारवाई पथकाने एक लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.ं
CoronaVirus News: केडीएमसीतील ३७ हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन राहणार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 12:51 AM