शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ९९१ रुग्णांची नव्याने वाढ, ३० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 8:04 PM

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे १५४ रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत.

ठळक मुद्देशहरात २२ हजार १५८  कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे.आजपर्यंत ७०० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार २०७ रुग्णांची सोमवारी वाढ झाली. त्यामुळे आज जिल्ह्यातील रुग्ण संंख्या ९९ हजार १५८ झाली आहे. तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला असता जिल्ह्यातील मृतांची संख्या आता दोन हजार ७७७ झाली आहे.  ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे १५४ रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात २२ हजार १५८  कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज अवघे पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत ७०० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात २०१ रुग्णांची आज वाढ झाली. तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत २२ हजार ६५३ रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या ४४८ झाली आहे. 

नवी मुंबई महापालिकेत २७४ रुग्णांची तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या १८ हजार ७५५ झाली आहे. तर, मृतांची संख्या ४७१ झाली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात आज दोन मृत्यू झाला आहे.  तर २९ नवे रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या १५९ तर सात हजार १६६ बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. 

भिवंडी महापालिका क्षेत्रात आज दहा बधीत आढळून आले. तर आज एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता बाधितांची संख्या तीन हजार ७८९ झाली आहे. तर आजपर्यंत मृतांची संख्या २५९ आहे. मीरा भाईंदरमध्ये आज १३१ रुग्णांची तर, पाच जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या नऊ हजार ७१४ झाली, तर, मृतांची संख्या ३१८ झाली आहे. 

अंबरनाथमध्ये आज ३७ रुग्णांची वाढ तर,एकाह जणाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आज बाधितांची संख्या चार हजार २८५ झाली. तर, मृतांची संख्या १६६ आहे. बदलापूरमध्ये ६१ रुग्णांची आज नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार १६१ झाली. या शहरात आजही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ५१ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात ९४ रुग्णांची वाढ झाली. आज सात मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या सात हजार ५१० आणि मृतांची संख्या २०५ झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे