शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ६० हजार पार, आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 3:27 AM

कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात सर्वाधिक ४९८ नवीन रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ७४ तर मृतांची २१६ इतकी झाली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ९८१ नविन रुग्णांसह ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या ६० हजार ४८८ तर मृतांची संख्या एक हजार ७२६ झाली आहे.कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात सर्वाधिक ४९८ नवीन रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ७४ तर मृतांची २१६ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे पालिका क्षेत्रात ४०० बाधितांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ४१९ तर मृतांची ५३० वर पोहोचली आहे.मीरा-भार्इंदरमध्येही नव्याने ९९ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ९५०; तर मृतांची २१० झाली. भिवंडी पालिका क्षेत्रात ५४ बाधित तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ९०४; तर मृतांची संख्या १५४ वर पोहोचली आहे. उल्हासनगरमध्ये नवीन २२६ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यू झाला. बाधितांची संख्या चार हजार ८४४ तर, मृतांची ७४ आहे. अंबरनाथमध्ये ५५ रुग्णांमुळे बाधितांची संख्या दोन हजार ८२९ झाली आहे. बदलापूरमध्ये ८९ रुग्णांमुळे बाधितांचा आकडा एक हजार ६१३ इतका झाला. याशिवाय, ठाणे ग्रामीण भागात २०४ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ५८२ तर मृतांची ९६ वर पोहोचली आहे.नवी मुंबईत ३१८ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात ३१८ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या १०,२७३ झाली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २७८ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६३५० झाली आहे.रायगडात ४६३ नवे रु ग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात बुधवारी ४६३ नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ८ हजार ६२८ वर पोहोचली आहे. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस