मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात कोरोनाचे 21 नवीन रुग्ण आढळले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 312 इतकी झालेली आहे. आणखी एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 9 झाला आहे . गेल्या काही दिवसात शहरात कोरोना रुग्णाची संख्या वेगाने वाढत आहे .
शनिवारी रात्री नऊच्या सुमारास पालिकेने दिलेल्या दैनंदिन अहवालानुसार शहरात दिवसभरात 21 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यात मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स भागात 4 , न्यू म्हाडा 2, तर काशिमीरा, पेणकरपाडा, ईडनरोझ, भारतीपार्क, शांती पार्क, आयडियल पार्क, दीपक रुग्णालय जवळ प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहेत.
भाईंदरच्या गणेश 2 तर 60 फूट मार्ग, जेसलपार्क, शिवसेना गल्ली, हनुमान नगर, क्रोपू महल येथे प्रत्येकी 1 कोरोना रुग्ण सापडले आहेत. नवघर मार्गावरील 38 वर्षीय लेखापाल ( अकाउंटंट ) यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. ते मुंबईला ये-जा करत होते .
कोरोनाचे बहुतांश रुग्ण मुंबईत खाजगी कंपनीत कामाला आहेत. या शिवाय आंबा व्यापारी, औषध वितरक, शिक्षक, शिंपी (टेलर ) , आया, गॅस शेगडी मॅकेनिक , गृहिणी आदी स्वरूपाचे आहेत . आता पर्यंत शहरात 9 कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत. तर 213 रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत .