ठाणे : जिल्ह्यातील आधीच्या कोरोना रुग्णांमध्ये एक हजार ५१ रुग्णांची मंगळवारी नव्याने वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील रूग्ण संख्या आता एक लाख २०९ झाली आहे. याशिवाय आज ५३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आता जिल्ह्यात दोन हजार ८३१ मृतांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या या कालावधीत सतत चर्चेत असलेल्या ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज १७४ नवे रुग्ण शोधले आहेत. यामुळे या शहरात आता कोरोनाचे २२ हजार ३३२ रुग्ण आज नोंदवण्यात आले. तर चार जणांचा मृत्यू झाल्याने आज या शहरातील मृतांची संख्या ७०४ झाली आहे. कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज १९६ रुग्ण नव्याने आढळून आले. तर आज दहा जणांचे मृत्यू झाल्यामुळे आता या शहरातील मृतांची संख्या ४५८ झाली. तर आतापर्यंत २२ हजार ८४९ रुग्ण या शहरात बाधीत झाल्याची नोंद झाली आहे.
नवी मुंबईत नव्याने २७८ रुग्णांची आज नोंद झाली असून सात जणांचे मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या १९ हजार ३३, तर, मृत्यूची संख्या ४७८ झाली आहे. उल्हासनगरला आज दोन मृत्यू झाले. तर नव्याने १९ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात आतापर्यंत सात हजार १८५ बाधीत रुग्णांसह १६१ मृतांची नोंद झाली आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात आज १८ रुग्ण सापडले. तर तीन मृत्यूची नोंद करण्यात आली. या शहरातही आता तीन हजार ८०७ बाधीतांची तर २६२ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे. आज मीरा भाईंदरमध्ये २०४ रुग्णांची तर, सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात बाधितांची नऊ हजार ९१८ तर, ३२४ मृतांची आतापर्यंत नोंद झाली आहे.
अंबरनाथ शहरात २९ नव्या रुग्णांची वाढ झाली तर, आज दोन मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत चार हजार ३१४ बाधीत, तर, १६८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये ३० रुग्ण आज नव्याने वाढले. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार १५८ झाली. या शहरात आज काही दिवसांनंतर दोन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या ५४ झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात नवीन १०३ रुग्णांची वाढ झाली. तर आज १७ मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या सात हजार ६१३ आणि मृतांची संख्या २२२ झाली आहे.