लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ५८५ नवीन रुग्ण कोरोनामुळे बाधित झाले असून, ३५ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६९ हजार १९० तर मृतांची संख्या एक हजार ९२७ इतकी झाली आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये रविवार प्रमाणेच सोमवारी देखिल सर्वाधिक ४२७ रुग्ण नव्याने दाखल झाले, तर नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या १६ हजार ३३४ तर मृतांची संख्या २५५ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये २५५ बाधितांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची १६ हजार २८ तर मृतांची संख्या ५७४ च्या घरात गेली. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातही २८६ नवीन रुग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. इथे आता बाधितांची ११ हजार ७१२, तर मृतांची संख्या ३४५ वर पोहोचली. मीरा-भार्इंदरमध्ये १२६ रुग्ण नव्याने दाखल झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ६८४ तर मृतांची संख्या २२६ इतकी झाली. भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रात ६८ जण बाधित झाले. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार १६६ वर पोहोचली. उल्हासनगरमध्ये १४० रु ग्णांची आणि पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. याठिकाणी बाधितांची संख्या पाच हजार ७६६ तर मृतांची संख्या ८८ वर पोहोचली आहे. अंबरनाथमध्ये ६३ रु ग्ण दाखल झाले असून सुदैवाने एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार १७१ तर मृतांची संख्या ११८ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ६० रुग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे याठिकाणी आतापर्यंच्या बाधितांची संख्या एक हजार ९७३ इतकी झाली. ठाणे ग्रामीण भागांत १६० रु ग्णांची, तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ३५६, तर मृतांची संख्या ११५ वर पोहोचली आहे.